शिवसेना पक्षात सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सुरुवातील फक्त १३ ते १५ आमदार होते. आता मात्र ही संख्या ४० पेक्षा जास्त झाली आहेत. शिंदे गटात सामील झालेले आमदार सध्या हुवाहाटीला असून ते हळूहळू माध्यमांसमोर येत असून बंडाची कारणं सांगत आहेत. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हेदेखील काही दिवसांपूर्वीच शिंदे यांच्या गटात सामील झाले असून त्यांनी राज्यसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार संजय पावार यांना पराभूत करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून प्रयत्न केला गेला असा गंभीर आरोप केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांना माघारी घेण्याचं आवाहन; म्हणाले “कुटुंबप्रमुख म्हणून मी…”

“राज्यसभा निवडणुकीसाठी आपण संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून तिकीट देणार होतो. पण आपण सर्वसामान्य शिवसैनिकाला तिकीट दिले. त्यानंतर या शिवसैनिकाला राज्यसभेत जाता येणार नाही यासाठी घटक पक्षांनी योग्य बंदोबस्त केला. अशाच पद्धतीने शिवसेना संपण्याचा प्रयत्न घटक पक्ष करत आहेत,” असा आरोप उदय सामंत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर केला.

हेही वाचा >>> अरबी समुद्रात हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांना वाचवण्यासाठी राबवलं रेस्क्यू ऑपरेशन

तसेच, “घटक पक्षाच्या वाईट नजरेच्या विळख्यातून शिवसेनेला बाहेर काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जी मोहीम आखली आहे त्यात मी सहभागी झालो आहे. त्यामुळे कोणीही गैरसमज करुन घेऊ नये. मी शिवसेनेत आहे त्याचाच विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे,” असे देखील उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis: “…याची आम्ही वाट पाहतोय”; फडणवीस दिल्लीत असतानाच नागपूरमध्ये मुनगंटीवारांचं सूचक विधान

तसेच, गुवाहाटीला गेल्यापासून सामंत यांच्या निष्ठेबाबत तर्कवितर्क लावले जात होते. याच कारणामुळे मी अजूनही शिवसेनेतच आहे, असे स्पष्टीकरण सामंत यांनी दिले आहे. “मला एक संभ्रम दूर करायचा आहे. मी शिवसेनेतच आहे. पण बाळासाहेबांच्या आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आमच्या घटक पक्षांमुळे वाईट नजर लागली आहे. त्यांच्या वाईट नजरेतून शिवसेनेला बाहेर काढण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांचे समर्थन करण्यासाठी मी गुवाहाटीला आलो आहे. मला पदाधिकाऱ्याना आवाहन करायचे आहे की कोणाच्याही गैरसमजांना बळी पडू नका. मी शिवसेनेत आहे. बाळासाहेबांची आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना टिकली पाहिजे,” असे उदय सामंत यांनी सांगितले.

हेही वाचा >>> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”

दरम्यान, एकनाथ शिंदे गुवाहाटी येथून लवकरच मुंबईमध्ये येणार असल्याचे म्हटले जात आहे. तसेच ते मुंबईमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वच आमदारांना पुन्हा एकदा परतण्याचे आवाहन केले आहे. परत या, समोर बसा, शिवसैनिक आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, असे उद्धव ठाकरे बंडखोर आमदारांना उद्देशून म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant colleges ncp and congress help for defeat of sanjay pawar in rajya sabha election 2022 prd
First published on: 28-06-2022 at 16:13 IST