रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड येथील गोळीबार मैदानात शिंदे गटाची जाहीर सभा होत आहे. या सभेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून कसे प्रयत्न झाले, यावर उदय सामंत यांनी भाष्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी उदय सामंत म्हणाले, “योगेश कदमांना राजकीयदृष्ट्या कसं संपवायचं? हे षडयंत्र ज्या बैठकीत रचलं. त्या बैठकीला मीदेखील उपस्थित होतो. दापोलीच्या निवडणुकीत योगेश कदमांना किती तिकिटं द्यायची, यावर फार मोठी चर्चा झाली. त्यांच्यापेक्षा राष्ट्रवादीला जास्त तिकिटं द्यायची, असा अघोषित नियम झाला होता. नंतर योगेश कदमांना काहीच द्यायचं नाही, त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवायची हा निर्णय शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला.”

हेही वाचा- “सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंवर टीकास्र सोडताना उदय सामंत म्हणाले, “पाच तारखेची सभा ही कॉर्नर सभा होती. ती विचार देणारी सभा नसून शिवीगाळ करणारी सभा होती. गेल्या ५० वर्षांत अनेक मुख्यमंत्र्यांना पायउतार व्हावं लागलं. आठ महिन्यांपूर्वी शिंदेंनी आम्हाला गुवाहाटीला नेऊन आणलं. ते काही लोकांना इतकं वर्मी लागलंय, की अजून ते बाहेरच आले नाहीयेत” असा टोला उदय सामंतांनी लगावला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant live speech in khed statement on yogesh kadam political end rmm
First published on: 19-03-2023 at 19:28 IST