भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी मशीद पाडण्यामध्ये शिवसैनिक नव्हते, अशा आशयाचं विधान केलं आहे. चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर ठाकरे गटाने भाजपासह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. बाळासाहेब ठाकरेंचा अवमान केल्याप्रकरणी चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा किंवा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.

दरम्यान, सत्ताधारी पक्षातील शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा विरोध केला आहे. आम्ही कुणीही चंद्रकांत पाटलांच्या विधानाशी सहमत नाही. बाबरी प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटलांनी माहिती घेऊन बोलायला हवं होतं, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे. ते मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
jitendra awad challenge to ajit pawar
“अजित पवारांच्या डोक्यातलं विष बाहेर आलं”, ‘द्रौपदी’वरच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाडांची टीका
Ayodhya darshan lured by Yogi Adityanath Claims to make all arrangements for the visitors
योगी आदित्यनाथ यांच्याकडून अयोध्या दर्शनाचे आमिष! दर्शनाला येणाऱ्यांची सर्व व्यवस्था करण्याचा दावा
Ganpat Gaikwad supporters support Shrikant Shinde in Kalyan East
कल्याण पूर्वेत गणपत गायकवाड समर्थकांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

हेही वाचा- महाविकास आघाडीतील खदखद चव्हाट्यावर? उद्धव ठाकरे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल, चर्चांना उधाण

चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा विरोध करताना उदय सामंत म्हणाले, “भाजपा नेते चंद्रकांत पाटील हे आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. पण काल त्यांनी जे विधान केलंय, त्याच्याशी आम्ही कुणीही सहमत नाही. मुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही सहमत नाहीत. तसेच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत काम करणारा कोणताही शिवसैनिक त्यांच्या मताशी सहमत नाही.”

हेही वाचा- ‘त्या’ विधानांवरून शरद पवारांनी उद्धव ठाकरेंसह फडणवीसांना सुनावलं, म्हणाले…

“बाबरी मशीद पाडल्यानंतर कुणा-कुणावर गुन्हे दाखल झाले, हे आपल्याला माहीत आहे. एकूण ४९ लोकांवर गुन्हे दाखल झाले होते. यामध्ये स्वत: बाळासाहेब ठाकरे, सतीश प्रधान, यूपीचे त्यावेळीचे राज्यप्रमुख अलोककुमार पांडे, अशोक सिंघल, लालकृष्ण आडवाणी असे अनेक नेते होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील हे आमचे ज्येष्ठ सहकारी असले तरी त्यांनी बोलण्याआधी थोडी माहिती घ्यायला हवी होती. बाळासाहेब ठाकरे हे बाबरी मशिदीच्या पाडावात नव्हते, हे सांगणं उचित नाही,” असंही उदय सामंत म्हणाले.

हेही वाचा- “बाबरी पाडताना तिथे प्रत्यक्ष शिवसैनिक कुणी नव्हतं, ती मशीद….”, ‘त्या’ विधानावर चंद्रकांत पाटलांचं स्पष्टीकरण

“कारण ज्यावेळी बाबरी किंवा राम मंदिराचा मुद्दा सुरू झाला. तेव्हा लालकृष्ण आडवाणी यांनी बाळासाहेब ठाकरेंची भेट घेतली. देशात सगळ्यात आधी त्यांनीच राम मंदिर यात्रेचं समर्थन केलं. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी काल बाबरी मशिदीच्या बाबतीत बाळासाहेब ठाकरेंचा काही संबंध नव्हता, असं वक्तव्य केलं होतं. पण याच्याशी आम्ही कुणीही सहमत नाही,” अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.