scorecardresearch

Premium

किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ठाकरेंच्या ‘मशाल’ चिन्हाचा डीपी; उदय सामंत म्हणाले…

“शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती”, असं किरण सामंत यांनी म्हटलं होतं.

uday samant uddhav thackeray kiran samant
किरण सामंत यांनी ठाकरे गटाचा मशाल डीपी ठेवण्यावर उदय सामंत बोलले आहेत. ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

दोन दिवसांपूर्वी मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या व्हॉट्सअ‍ॅपवरील डीपीमुळं राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली होती. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत असलेल्या किरण सामंत यांनी डीपीवर ठाकरे गटाचं ‘मशाल’ चिन्ह ठेवलं होतं. तसेच, कॅप्शनला ‘जो भी होगा देखा जागेया’ असं लिहिण्यात आलेलं. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या होत्या. यावर मंत्री उदय सामंत यांनी भाष्य केलं आहे.

उदय सामंत म्हणाले, “मी आणि माझे कुटुंब एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आहे. याविषयाला पूर्ण विराम मिळालेला आहे. किरण सामंत स्वत:हा ठाकरे गटातील अनेक पदाधिकाऱ्यांचा प्रवेश करून घेत आहेत. घडलेल्या प्रकाराबद्दल किरण सामंत यांनीही खुलासा केला आहे. कुटुंब म्हणून राजकीय आणि सामाजिक निर्णय एकत्र बसून घेतो.”

devendra fadnavis sharad pawar
राष्ट्रपती राजवटीवरून देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट, शरद पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “भाजपाकडं बहुमत होतं, तर…”
uddhav thackeray kiran samant (1)
उदय सामंतांचे बंधू किरण सामंतांच्या व्हॉट्सअ‍ॅप डीपीवर ‘मशाल’, ठाकरे गटातील खासदाराचं सूचक विधान; म्हणाले…
jitendra awhad tweet elvish yadav
Video: यूट्यूबर एल्विश यादव एकनाथ शिंदेंच्या घरी; जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा महाराष्ट्राचा अपमान!”
What Eknath Khadse Said?
“पवारांची साथ सोडण्यासाठी दोन बड्या नेत्यांच्या ऑफर्स, भाजपाकडून तर…”, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

“…तसं कुणी करू नये”

“आम्ही एकनाथ शिंदे यांच्याबरोबर राहणार आहोत. चुकून डीपी बदलल्यानं किरण सामंत यांना आपल्याकडं घेऊयात, असं काहींना वाटत असेल. पण, तसं कुणी करू नये,” असेही उदय सामंत यांनी म्हटलं.

“एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला”

व्हॉट्सअ‍ॅप डीपी प्रकरणावर किरण सामंत यांनी सांगितलं, “मी डीपी ठेवला होता. याला काही कारणं होती. त्यावर योग्यवेळी बोलेन. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांकडे पाहून डीपी मागे घेतला.”

“उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं”

‘जो भी होगा देखा जाये गा’ असं कॅप्शन लिहिण्याबाबत किरण सामंत म्हणाले, “शंभर टक्के सर्व गोष्टीला आपली तयारी होती. फक्त उदय सामंत यांच्या राजकीय करिअरमुळे कॅप्शन मागे घेतलं. माझ्यामुळे उदय सामंत यांचं राजकीय करिअर खराब होऊ नये.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uday samant on kiran samant whats app dp thackeray mashal ssa

First published on: 01-10-2023 at 17:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×