scorecardresearch

Premium

“भरत गोगावलेंवर एकनाथ शिंदेंचं विशेष प्रेम, त्यामुळे…”, उदय सामंत यांचं वक्तव्य चर्चेत

राज्य सरकारमध्ये मंत्रीपद मिळावं यासाठी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत आहेत.

Uday Samant Bharat Gogavle
उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळावं अशी माझी इच्छा आहे.

शिंदे गटाचे नेते आणि महाडचे आमदार भरत गोगावले राज्य मंत्रिमंडळातील प्रवेशासाठी आतूर आहेत. अलिकडेच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले यांना मंत्रीपद मिळेल अशी चर्चा होती. परंतु, त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला एक गट सत्तेत सहभागी झाला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री झाले तर राष्ट्रवादीचे इतर आठ आमदार मंत्री झाले. परंतु, गोगावले यांना मंत्रीपद मिळालं नाही. तसेच शिवसेनेच्या शिंदे गटातील किंवा भारतीय जनता पार्टीमधल्या कोणत्याही आमदाराला नव्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही.

मंत्रीपद न मिळाल्याने भरत गोगावले यांनी त्यांच्या मनातली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. “छत्रपती शिवाजी महाराज यांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे आमच्यासारख्यांच्या जीवावर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले,” असं वक्तव्य करून गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तर भरत गोगावले यांना नक्कीच मंत्रीपद मिळेल, असा दावा केला जात आहे. परंतु, मंत्रिमंडळ विस्ताराच्या आशा आता मंदावल्या आहेत.

himachal pradesh political crisis
हिमाचलमधील सरकार वाचविण्याचे प्रयत्न; काँग्रेस निरीक्षक राज्यात दाखल; नाराज आमदारांशी चर्चा
Firecrackers brought for Raj Thackeray burn for BJPs Kapil Patil
मनसेचे फटाके, भाजपाचे राज्यमंत्री कपिल पाटील यांच्यासाठी फोडले; कल्याणमध्ये कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहाची फजिती
CM Eknath SHinde
“जागतिक तेलाच्या अर्थकारणापासून राजकारणातल्या तेल लावलेल्या पैलवानापर्यंत…”, लोकसत्ताच्या वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून स्तुतीसुमने
CM Mohan Yadav MP government change
IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या ते मंत्र्यांसाठी विशेष शिकवणी; मोहन यादव MP सरकार कसे चालवतायत?

आपल्याला मंत्रीपद मिळावं अशी भरत गोगावले यांची इच्छा आहे. त्याचबरोबर शिवसेनेच्या शिंदे गटातील अनेक आमदार, मंत्री आणि भरत गोगावलेंचे समर्थक नेते-पदाधिकाऱ्यांचीही तशीच इच्छा आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीदेखील ही इच्छा बोलून दाखवली आहे. उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले मंत्री झाले पाहिजेत ही माझीही प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल.

हे ही वाचा >> सूर्याच्या दिशेने झेपावणाऱ्या Aditya-L1 बाबत मोठी अपडेट, ISRO चा दुसऱ्यांदा मोठा पराक्रम, एका महिन्यात ‘इतकं’ अंतर पार

उदय सामंत म्हणाले, भरत गोगावले हे आमचे मंत्रिमंडळातील सहकारी आहेत. त्यांचं मन खूप मोठं आहे, हे अनेकवेळा आम्ही सांगितलं आहे. ते आमचे मुख्य प्रतोददेखील आहेत. भरत गोगावले मंत्री नसले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं त्यांच्यावर विशेष प्रेम आहे. आम्ही जरी मंत्री असलो तरी गोगावले स्वतः मंत्री असल्यासारखेच आमच्याकडून कामं करून घेतात. परंतु, ते मंत्री झाले पाहिजेत ही माझीदेखील प्रामाणिक इच्छा आहे आणि तो योग लवकरच येईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uday samant says eknath shinde has special honor for bharat gogawale he will become minister soon asc

First published on: 01-10-2023 at 13:10 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×