मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दीपक केसकरांकडून प्रवक्ते पद काढून घेणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून उधाण आले होते. शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी याबाबत ट्वीट करत या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ‘दीपक केसकरच आमचे मुख्य प्रवक्ते आहेत. यात कोणताही बदल करण्यात आला नसून अफवांवर विश्वास ठेऊ नये’, असे ट्वीट सामंतांनी केले आहे.

हेही वाचा- ‘घरी बसा म्हणणाऱ्या’ अजित पवारांना देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले “फक्त डायलॉगबाजी…”

राणे कुटुंबीयांबाबत केसकरांचे वादग्रस्त विधान

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणेंनी आदित्य ठाकरेंची बदनामी केली. आदित्य ठाकरेंची बदनामी करण्यात राणे पिता-पुत्रांचा मोठा वाटा असल्याचे खळबळजन विधान केसकरांनी केलं होतं. या विधानानंतर दीपक केसकर आणि राणे कुटुंबीयात वाद निर्माण झाला आहे. केसरकर यांच्या वादग्रस्त विधानामुळे शिंदे गट अडचणीत येत आहे. त्यामुळे लवकरच किरण पावसकर यांच्याकडे शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाची जबाबदारी जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा- “आमदार शिंदे गटातून बाहेर पडणार,” अजित पवारांचा दावा, शहाजीबापू म्हणाले “त्यांना राजकारणापेक्षा भविष्यात…”

निलेश राणेंची केसकरांना नोकरीची ऑफऱ

आज (रविवार) सकाळी निलेश राणेंनी ट्वीट करत दीपक केसकरांवर टीका केली आहे. ‘दीपक केसरकर म्हणतो, मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे’, अस म्हणत राणेंनी केसकरांना नोकरीची ऑफर दिली आहे. आता राणेंच्या या ऑफरला केसकर कसा प्रतिसाद देतात हे पाहणं महत्वाचे आहे.