उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा! | uday samant visit sangli jath taluka village farmers told their problem | Loksatta

उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!

उद्योगमंत्री उदय सामंत यांना दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले.

उदय सामंत यांनी दिली जत तालुक्यातील गावांना भेट, स्थानिकांनी मांडल्या व्यथा!
उदय सामंत (संग्रहित फोटो)

सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांना दुष्काळग्रस्तांच्या आक्रोशाला सामोरे जावे लागले. वर्षानुवर्षे इथले शेतकरी पाण्यापासून वंचित आहेत. आतापर्यंत फक्त आश्वासनं मिळाली मात्र पाणी मिळाले नाही, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.

हेही वाचा >>> नालासापोऱ्यात घरफोडी करणार्‍या चोराला रंगेहाथ अटक, नागरिकांनी केलेल्या मारहाणीची चित्रफित व्हायरल

उदय सामंत यांनी जत तालुक्यातील गावांना भेट दिल्यानंतर येथील शेतकऱ्यांनी त्यांची व्यथा मांडली. तिकुंडी गावात दुष्काळग्रस्तांची सावंत यांनी संवाद साधला. यावेळी आमच्या व्यथा जाणून घ्याव्या, असे सांगत दुष्काळग्रस्त आक्रमक झाले. येथे वाद होण्याची शक्यता होती. यावेळी दुष्काळग्रस्त महिलेला आपली व्यथा मांडत असताना अश्रू अनावर झाले.

हेही वाचा >>>मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल

जतच्या ४२ गावांना तत्काळ पाणी द्यावे त्याचबरोबर मराठी शाळा सुरू कराव्यात, रोजगार उपलब्ध करून द्यावा, रस्ते व्हावेत अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी केल्या. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे मंत्र्यांनी थेट आश्वासन देण्याचे टाळले. मात्र दुष्काळग्रस्तांच्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील, असा विश्वास उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दुष्काळग्रस्तांना दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-12-2022 at 19:22 IST
Next Story
सांगली: वाळवा तालुक्यात ऊसाच्या फडात आढळला जखमी रानगवा; उपचारानंतर नैसर्गिक आधिवासात सोडणार