अलिबाग : छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना घटनात्मक पदावर राहण्याचा अधिकार नाही. राज्यपाल कोश्यारी असो अथवा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांची उचलबांगडी झाली पाहिजे, अशी ठाम भुमिका खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतली. ते किल्ले रायगडावर शिवसन्मान निर्धार आंदोलनानंतर पत्रकारांशी बोलत होते, राज्यपालांना महाराष्ट्रातून परत पाठवले नाही तर मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करीन, असा इशारा त्यांनी या वेळी दिला. राज्यपालांना पाठीशी घालणारेही तितकेच दोषी असल्याचे त्यांनी या वेळी सुनावले.

राजेशाही असती तर महाराजांबद्दल अनुद्गार काढणाऱ्यांना टकमक टोकावरून ढकलून दिले असते. फीत लावून काही होणार नाही. राज्यपालांची उचलबांगडी व्हायला हवी. ती होणार नसेल तर त्याचे उत्तर शासनाने जनतेला द्यायला हवे. राज्यपाल हे मोठे पद आहे. पण त्या पदावर राहणाऱ्यांनी पदाचा सन्मान राखयला हवा. बोलताना विचारपुर्वक बोलायला हवे. ज्या राज्यात छत्रपतींचे नाव घेऊन राज्यकारभार चालवला जातो. त्याच राज्यात महाराजांचा अवमान तर सहन किती आणि कसे करणार, असा सवाल त्यांनी या वेळी केला. राज्यपालांविरोधात लवकरच आझाद मैदान येथे एल्गार करणार असल्याचे त्यांनी या वेळी जाहीर केले. तसेच शिवाजी महाराजांचे विचार घेऊन राज्यभरात जाणार असल्याची घोषणा त्यांनी या वेळी केली.
शिवसन्मान निर्धार आंदोलनासाठी सकाळी पावणेअकराच्या सुमारास उदयनराजे गडावर दाखल झाले.

Sambhaji Raje Chhatrapati, criticises bjp, 400 seats change constitution, Sambhaji Raje Chhatrapati criticises bjp, shahu maharaj, kolhapur lok sabha seat
संविधान मोडून काढण्यासाठी ‘चार सो पार’ची धडपड – संभाजीराजे छत्रपती
virendra mandlik criticizes shahu chhatrapati s family
छत्रपती कुटुंबाने राजर्षी शाहू महाराजांच्या नावाला साजेसे काम केले नाही; मंडलिक घराण्याची पुन्हा एकदा टीका
udayanraje bhosale, nomination, satara lok sabha 2024 election
मला उमेदवारी मिळणार हे निश्चित – उदयनराजे
Sanyogeetaraje Chhatrapati
कोल्हापूर जिल्ह्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाहू महाराज सक्षम उमदेवार – युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती