छत्रपतींच्या घराण्यावर आरोप करणारे विकृत मनोवृत्तीचे आहेत. त्यांना जास्त महत्त्व देत नाही असे खासदार उदयनराजे भोसले यांनी संजय राऊत यांच्या बाबत म्हटले आहे.शिवगर्जना संपर्क अभियानाच्या निमित्ताने साता-यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी छत्रपतींच्या घराण्यावर टीका केली होती. याविषयी साताऱ्यात खासदार उदयनराजे माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले,राजकारणात कोणीही कोणावरही शिंतोडे उडू शकतो. राजकारणात प्रत्येकाने मोजून मापून समजून बोललं पाहिजे. मी त्यांना जास्त ओळखत नाही आणि महत्त्वही देत नाही. त्यांचं सगळं राजकारण हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावा भोवती फिरत आहे, तरीही ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याबद्दल बोलत असतात. असे बोललेल्याने त्यांना तात्पुरते महत्व मिळते दूरपर्यंत मिळत नाही. आम्ही कधी सोयीचे राजकारण करत नाही.
केलं असेल तर आम्ही समाजकारणच केलं .आम्ही कधी त्यांच्यावर टोकाशी टीका केली नाही. पूर्वी कोण कोणाची नेमणूक करत होते आणि आता कोण कोणाची नेमणूक करत आहे हे सांगण्याचा अधिकार त्यांनी गमावला आहे. भाजपला छत्रपतींच्या घराण्याविषयी आदर नाही असे ते म्हणाल्याचे निदर्शनास आणले असता उदयनराजे म्हणाले भाजपामध्ये आमच्याविषयी आदर आहे की नाही हे तुम्ही कोण ठरवणार.आम्हाला माहिती आहे ना आमच्याविषयी किती आदर आहे. तुम्ही आमचा अनादर करता ते कोणाचा ऐकून तुम्ही आमचा अनादर करता. ज्या घराण्याच्या नावामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्याची थोडी तरी लाज बाळगायला हवी. आमचा आदर करतात आणि अनादर करायचा कोणाचा घास आहे का. साताऱ्यातच नाही तर कुठेही आमच्या घराण्याविषयी बोलू नये. समाजामध्ये तेढ निर्माण होईल असं वक्तव्य त्यांनी टाळलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी कराव त्यांना दिला.