भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एकेरी भाषा वापरल्याच्या निषेधार्थ खासदार उदयनराजे समर्थकांनी पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर शेंद्रे गावानजीक महामार्गावर टायर पेटवून रस्ता बंद केला आणि दानवे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. या घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका वाहतूक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत महामार्गावर पेटवलेले टायर बाजूला करत रस्ता मोकळा केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- राज्यपालांबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला; म्हणाले, “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”

मागील काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तसेच भाजपाच्या काही नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त विधानं केली आहेत. याच कारणामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. नुकतेच भाजपाचे नेते तथा आमदार प्रसाद लाड यांनी शिवरायांचा जन्म कोकणात झाला, असे विधान केले होते. त्यानंतर केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांचादेखील एक व्हिडीओ समोर आला. या व्हिडीओमध्ये दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना दिसत आहेत.

हेही वाचा- छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर भाजपा कारवाई का करत नाही? काँग्रेसचा सवाल

दरम्यान, या व्हिडीओनंतर दानवे यांच्यावरदेखील टीका केली जात होती. हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर दानवे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सध्या समोर आलेला व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती. मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही, असे स्पष्टीकरण दानवे यांनी दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Udayanraje bhosle activists protest on pune bangalore highway against bjp union minister raosaheb danve statement on chhatrapati shivaji maharaj dpj
First published on: 05-12-2022 at 18:17 IST