scorecardresearch

शिवसेना कुणाची? ठाकरे की शिंदे? निवडणूक आयोगाने दिली पुढची तारीख, आता द्यावं लागणार लेखी उत्तर!

दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे.

शिवसेना कुणाची? ठाकरे की शिंदे? निवडणूक आयोगाने दिली पुढची तारीख, आता द्यावं लागणार लेखी उत्तर!
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मागील जवळपास साडेतीन तासांपासून निवडणूक आयोगासमोर ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तीवाद सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तीवाद करण्यात येत आहे. दोन्ही गटांनी ‘शिवसेना’ पक्षाचं नाव आणि ‘धनुष्यबाण’ पक्ष चिन्हावर दावा सांगितला आहे. निवडणूक आयोगासमोरील युक्तीवाद अंतिम टप्प्यात आला असला तरी मूळ शिवसेना कुणाची आणि धनुष्यबाण कोणला द्यायचा? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

सोमवारी (३० जानेवारी रोजी) याबाबत लेखी उत्तर दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. दोन्ही गटांनी लेखी उत्तर दाखल केल्यानंतर पुढील सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे २३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा पक्षप्रमुख पदाचा कार्यकाल संपणार आहे. त्यामुळे मूळ शिवसेना नेमकी कुणाची हा पेच आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-01-2023 at 19:59 IST

संबंधित बातम्या