scorecardresearch

Premium

VIDEO : “एक फूल दोन हाफला आंदोलनाची कल्पना नव्हती का?” जालना प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा त्रिशूळ सरकारवर हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांनी पोलिसांना लक्ष्य करत सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे म्हणाले, "शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणजे 'शिवसेनेची काँग्रेस' झाली म्हणतात. गेली ३० वर्ष आम्ही भाजपाबरोबर होतो. मात्र, आमचा कधी भाजपा झाला नाही. मग, काँग्रेस कसा होईल? शिवसेनेनं भाजपाला सोडलंय, हिंदूत्वाला नाही. भाजपाने हिंदूत्वाची मालकी घेतली नाही. मला भाजपाचं हिंदूत्व मान्य नाही," अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली आहे.

जालन्यात अंरतवाली येथे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला आहे. याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस आणि पवार सरकारवर हल्लाबोल केला आहे. तुम्हाला ‘इंडिया’ आघाडीच्या विरोधात बोलण्यास वेळ आहे. पण, एकाही मंत्र्याला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. दोन फुल एक हाफमधील एकही नेता भेटण्यास गेला नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

“मी जालन्याला जाणार आहे. शुक्रवारी जालन्यात शासकीय अत्याचार झाला. याचा फक्त निषेध करून चालणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने सरकारवरती ताशेरे मारले आहेत. सरकार म्हणजे नेमकं कोण? पाहिलं तर ‘एक फुल, दोन हाफ’ आहेत. राज्यात आंदोलन सुरू असून, माता-भगिनी उपोषणाला बसले आहेत, मात्र कोणाकडेही वेळ नाही. ‘इंडिया’ची पत्रकार परिषद सुरू असताना एका ‘उप’ने पत्रकार परिषद घेतली,” असं अप्रत्यक्षपणे टीकास्र उद्धव ठाकेंनी फडणवीसांवर केलं आहे.

Proactive action against accused in Sharad Mohol murder case pune news
शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का कारवाई; मुख्य सूत्रधार गणेश मारणेचा शोध सुरूच
pimpri Criminals pistols
पिंपरीत ३ पिस्तुले आणि ४ जिवंत काडतुसे बाळगणारे सराईत गुन्हेगार जेरबंद; दरोडा विरोधी पथकाची कारवाई
ravindra chavan vikas mhatre dombivli resignation corporator bjp
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर विकास म्हात्रे यांनी राजीनामा घेतला मागे
K K Nair
नेहरूंचा आदेश झुगारून रामलल्लाची मूर्ती हटविण्यास विरोध; निलंबनाविरोधात कायदेशीर लढा देणारे ‘नायर साहेब’ कोण होते?

हेही वाचा : “आधी कुटुंब सांभाळा मग घराणेशाहीवर बोला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचा टोला

“‘एक फुल दोन हाफ’मधला एकही आंदोलकांना भेटला नाही”

“तुम्हाला ‘इंडिया’च्या विरोधात बोलायला वेळ आहे. मात्र, एकाही मंत्र्यांला आंदोलकांना भेटण्यास वेळ मिळाला नाही. ‘एक फुल दोन हाफ’मधला एकही गेला नाही. आता चौकशीचा फार्स आवळला जाणार. आम्ही काहीच केलं नाही, सखोल चौकशी करणार,” असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

“सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस होऊ शकतो?”

“प्रत्येक मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना राज्यात काय चालू आहे, याची कल्पना दिली जाते. एक फुल दोन हापला हे आंदोलन सुरु असल्याची माहिती नव्हती का? बारसूला मारहाण झाली, वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला. आता जालन्यात लाठीहल्ला झाला आहे. पण, अजूनही चौकशा सुरू आहेत. करोना काळत पोलिसांनी जिवाची बाजी लावून महाराष्ट्र वाचवला. ते पोलीस एवढे राक्षस होऊ शकतात? सरकार बदलल्यावर पोलीस राक्षस होऊ शकतो? कोणतरी याच्या पाठीमागे आदेश देणार आहे,” अशी शंका उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केली.

“तुम्ही कोण चौकशी करणारे?”

“सरकार आपल्या दारी थापा मारते लय भारी. तो कार्यक्रम त्यांना तिकडे घ्यायचा आहे. आता घेऊ शकतील का माहिती नाही. ७०-७५ वर्षाच्या वृद्धेलाही घरात घुसून मारहाण करण्यात आली. आम्ही सखोल चौकशी करू, दोषींना सोडणार नाही. पहिले तुमच्यावर दोषारोप झाले, म्हणून सत्तेवर जाऊन बसलात. तुम्ही कोण चौकशी करणारे?” अशी टीका उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray attacks shinde fadnavis and pawar govt over jalana maratha protester police ssa

First published on: 02-09-2023 at 14:02 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×