राज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला आहे. २० नोव्हेंबर रोजी २८८ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यादृष्टीने ठिकठिकाणी राजकीय नेत्यांच्या सभा आयोजित करण्यात आल्या असून यासभांमध्ये नेत्यांकडून एकमेकांकडून टीका टीप्पणी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे, अशातच आज उद्धव ठाकरे यांनी कोकणातीन सभेतून नारायण राणे यांच्यासह महायुतीवर सडकून टीका केली आहे.

उद्धव ठाकरे यांची आज कणकवलीत सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना त्यांनी नारायण राणे, दीपक केसरकर आणि अमित शाह यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना लक्ष्य केलं. पंतप्रधान मोदी आज घराणेशाहीवर बोलतात, त्यांना बाळासाहेबांचा वारस म्हणून मी नको आहे. पण कोकणात ते बाप डोक्यावर व त्याची दोन मुले खांद्यावर घेऊन फिरत आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा – Raj Thackeray : राज ठाकरेंची टीका, “उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला..”

सिंधुदुर्गातील गुंडगिरी काही वर्षांपूर्वी कोकणातल्या जनतेने संपविली होती. मात्र, यंदा चुकून ते खासदार म्हणून निवडून आले. आता पुन्हा त्यांची दादागिरी सुरु होईल. आता जर पुन्हा तीच चूक झाली, तर बाप डोक्यावर आणि मुले खांद्यावर घेऊन जगायची वेळ येईल, असं म्हणत त्यांनी नारायण राणे यांच्यावरही घणाघात केला.

हेही वाचा – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील वाहनांची मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली तपासणी नाक्यावर तपासणी

पुढे बोलताना त्यांनी दीपक केसरकर यांनाही लक्ष्य केलं. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणतो. यांना जोडे नाही मारायचे तर काय मारायचं? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच काहीतरी चांगलं होईल, अशी टीका त्यांनी केली. तसेच नारायण राणेंना त्यांच्या साईजप्रमाणे सूक्ष्म खातं मिळालं होतं. मात्र, त्यांनी एकही सुक्ष्म उद्योग कोकणात आणला नाही, असा टोलाही त्यांनी नारायण राणे यांना लगावला.

Story img Loader