गेल्या जवळपास वर्षभरापासून मणिपूरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. या घटनांत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, तरीही हिंसाचाराच्या घटना कमी होताना दिसत नाहीत. यातच आता पुन्हा एकदा मणिपूरमध्ये हिंसाचार उसाळून आला आहे. दरम्यान, यावरून आता शिवसेनेच्या ठाकरे गटाने मोदी सरकारला लक्ष्य केलं आहे. आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा, अशी टीका शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने नेमकं काय म्हटलं?

मणिपूरमधील वांशिक हिंसेचा वणवा नवनवीन भागांत पसरत आहे. देशाचे पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्री मात्र त्याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र व झारखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दंग आहेत. पंतप्रधान ‘एक है तो सेफ है’ अशा गैरलागू घोषणा देत फिरत आहेत. पण महाराष्ट्र आणि झारखंडच नव्हे, तर हा संपूर्ण देशच ‘एक’ आहे आणि ‘सेफ’ आहे. तुम्हीच त्याची जातीय धार्मिक फाळणी करून तो ‘अनसेफ’ करीत आहात. मणिपूरसारखे संवेदनशील सीमावर्ती राज्यदेखील आज वांशिक भेद आणि त्यातून उफाळणाऱ्या हिंसाचाराने असुरक्षित बनले आहे ते तुमच्याच राजवटीमुळे. त्यामुळे आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग महाराष्ट्र-झारखंडमध्ये धार्मिक ऐक्याचे नक्राश्रू ढाळा, अशी टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.

Rakesh Roshan
‘कहो ना प्यार है’नंतर राकेश रोशन यांच्यावर झालेला गोळीबार; अंडरवर्ल्डचा होता संबंध, खुलासा करत दिग्दर्शक म्हणाले, “हृतिकने त्यांच्या पैशातून…”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
uddhav Thackeray Devendra fadnavis
“पुढील मकर संक्रांतीपर्यंत ठाकरे-फडणवीस एकत्र”, आमदार रवी राणांचा दावा
Vaibhavi Deshmukh Demand For Justice
Maharashtra News Updates : “पप्पांना रस्त्यावरून उचललं, आता काकाला…”, संतोष देशमुखांच्या लेकीचा सरकारवर संताप
Uddhav Thackeray Amol Kohle
“अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार”, ठाकरेंच्या शिवसेनेचा पलटवार
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
Devendra Fadnavis Speech
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने हास्यकल्लोळ, “सकाळचा शपथविधी नको म्हणून यावेळी आम्ही संध्याकाळी…”

हेही वाचा – Uddhav Thackeray : “जरा डोक्याला ब्राह्मी तेल लावा, मग…”, उद्धव ठाकरेंची अमित शाह यांच्यावर बोचरी टीका

मणिपूर हे मागील दीड वर्षापासूनच वांशिक हिंसेच्या वणव्यात होरपळते आहे. तेथे जाऊन हा वणवा विझवावा असे ना पंतप्रधानांना वाटते, ना केंद्रीय गृहमंत्र्यांना. त्यामुळे काही काळ वरकरणी शांतता दिसते, परंतु एखाद्या घटनेच्या निमित्ताने कुकी आणि मैतेई या दोन समाजांत खदखदत असलेला ‘लाव्हा’ उफाळून येतो व मणिपूर परत परत हिंसेच्या वणव्यात होरपळत राहते, असेही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

हेही वाचा – Uddhav Thackeray: “पंकजाताई मुंडे तुझे धन्यवाद…”, उद्धव ठाकरेंनी केलं कौतुक; म्हणाले, ‘तुम्ही महाराष्ट्राच्या डोळ्यावरची पट्टी काढली’

परिस्थिती चिघळल्याने मणिपूरमधील सहा पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात ‘आफस्पा’ कायदा लागू करण्याची वेळ केंद्र सरकारवर आली आहे. सध्या ज्या जिरीबाम जिल्ह्यात हिंसेचा आगडोंब उसळला आहे, तिथेही हा कायदा लागू करण्यात आला आहे. मणिपूरमधून ‘आफस्पा’ काढून घेतला, असे मोठ्या तोंडाने सांगणाऱ्या केंद्र सरकारवर तो पुन्हा लागू करण्याची वेळ का आली? असा प्रश्नही ठाकरे गटाने उपस्थित केला आहे.

Story img Loader