scorecardresearch

“ठाकरे गट नाही, शिवसेना…”, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीआधी संजय राऊतांनी मांडली स्पष्ट भूमिका!

संजय राऊत म्हणतात, “वेळकाढूपणा चालला आहे. संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी केलेली बेईमानी आहे. गेल्या वर्षभरापासून…!”

sanjay raut on supreme court hearing
संजय राऊतांची सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर भूमिका (फोटो – एएनआय संग्रहीत)

शिवसेना पक्षनाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगानं दिला. उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, या निर्णयाला ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून त्यावर आजपासून सुनावणी होत आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठानं चार महिन्यांपूर्वी निवडणूक आयोगानं घेतलेल्या निर्णयासंदर्भात नियम पाळले जाण्याची टिप्पणी केली होती. या सर्व प्रकरणावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भूमिका मांडली आहे.

“सत्य व न्यायाचा विजय होईल”

“न्यायालयात आज काय होणार यावर मी बोलणार नाही. पण सत्य, न्याय याचा विजय होईल. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश स्पष्ट आहेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात.. विधिमंडळातली फूट म्हणजे पक्षातली फूट नाही हे स्पष्ट केल्यामुळे चिन्ह व नाव याबाबत कोणताही संभ्रम असण्याचं कारण नाही. विधिमंडळातले आमदार किंवा संसदेतले खासदार सोडून केले म्हणजे पक्ष फुटला हे मान्य करता येणार नाहीत असे न्यायालयाचे निर्देश आहेत. त्यामुळे शिवसेना एकसंघ आहे, एकसंघ राहील”, असं संजय राऊत म्हणाले.

couple Kulhad Pizza Couple Private MMS Leak
कुल्हड पिझ्झा कपलचा प्रायव्हेट व्हिडीओ लीक? सेहज अरोराने दिलं स्पष्टीकरण, म्हणाला ‘माझी चूक…’
amruta-fadanvis-daughters-day-post
“माझी मुलगीही ‘Awesome’ आहे, कारण…” जागतिक कन्या दिनानिमित्त अमृता फडणवीसांची खास पोस्ट
gang rape
संतापजनक: मध्यरात्री घरात घुसून विवाहितेवर गँगरेप; काही तासांतच जोडप्याने उचललं टोकाचं पाऊल
ramdas athawle on eknath shinde
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपद धोक्यात? कुणाची वर्णी लागणार? रामदास आठवले म्हणाले…

“ठाकरे गट नाही, शिवसेना…”

दरम्यान, यावेळी एका पत्रकाराने ‘ठाकरे गट’ असा उल्लेख करून संजय राऊतांना प्रश्न विचारताच राऊतांनी ‘ठाकरे गट नाही, शिवसेना’ असं ठामपणे सांगितलं. राहुल नार्वेकरांसमोर आमदार अपात्रतेची सुनावणी चालू असल्याबाबत विचारणा केली असता वेळकाढूपणा चालल्याचं राऊत म्हणाले.

ठाकरे गटाचा बाबा रामदेव यांच्यावर हल्लाबोल; ‘त्या’ विधानावरून टीकास्र, भाजपाचाही केला…

“वेळकाढूपणा चालला आहे. संविधान, कायदा, विधिमंडळाचे नियम याच्याशी केलेली बेईमानी आहे. गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रात घटनाबाह्य सरकार चालवलं जातंय. सहा महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊनही सुनावणी घेतली जात नाही. त्यामुळे घटनाबाह्य सरकारला घटनात्मक पदावर बसलेले विधानसभेचे अध्यक्ष चालवतायत का? की चालवू देतायत? हा प्रश्न आहे”, असं ते म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-09-2023 at 11:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×