राजधानी दिल्लीत देशाच्या पदक विजेत्या महिला कुस्तीपटू लैंगिक शोषणाविरोधात आंदोलन करत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर त्यांनी गंभीर आरोप केले असून त्यांच्या अटकेची मागणी केली जात आहे. यासंदर्भात दिल्ली पोलीस किंवा केंद्र सरकारकडून घेण्यात आलेल्या भूमिकेवर टीका केली जात असताना क्रीडा क्षेत्रातून अजूनही अनेक दिग्गजांनी आपली भूमिका घेतलेली नाही. यासंदर्भात वारंवार मुद्दे उपस्थित केले जात असताना आता काँग्रेसनं थेट सचिन तेंडुलकरच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. यासंदर्भात काँग्रेसनं लावलेल्या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आता संजय राऊतांनी त्यावर भूमिका मांडली आहे.

नेमकं झालं काय?

महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर देशातील अनेक विरोधी पक्षांनी आक्रमक भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय स्तरावरूनही यासंदर्भात महिला कुस्तीपटूंची बाजू घेतली जात असल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील क्रीडाविश्वातील दिग्गजांकडून मात्र अद्याप पुरेसा पाठिंबा येत नसल्याची खंत विनेश फोगाटनं काही दिवसांपूर्वी बोलून दाखवली होती. त्याचसंदर्भात आता काँग्रेसच्या नावाने भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला उद्देशून लावण्यात आलेल्या बॅनर्सचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.

ajit pawar budget speech
अजित पवारांनी कुसुमाग्रजांच्या ‘या’ कवितेच्या ओळी म्हणताच सभागृहात हशा; म्हणाले, “विरोधकांनी प्रतिक्रियांचा पुनर्विचार करावा!”
Devendra Fadnavis on BJP Workers
‘भाजपाच्या ९० टक्के कार्यकर्त्यांना काहीच मिळणार नाही’, काँग्रेस नेत्यांच्या पक्षप्रवेशावर देवेंद्र फडणवीस स्पष्टच म्हणाले…
Fali Nariman
फली नरीमन ‘हिंदू-धर्माधारित राज्या’बद्दल काय म्हणाले होते?
Sanjay Raut Narendra Modi Putin
“आमच्यावर विषप्रयोग करून…”, पुतिन यांचा दाखला देत संजय राऊतांचा पंतप्रधान मोदींना टोला; म्हणाले, “प्रखर बोलणाऱ्यांविरुद्ध…”

“मतविरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी…”

या बॅनर्सवर थेट सचिन तेंडुलकरलाच जाब विचारण्यात आला आहे. “मतविरहित भारतरत्न सचिन तेंडुलकरजी, भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये तुम्ही मूग गिळून गप्प का?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. “किसान आंदोलनावर बोलणाऱ्या परकीय महिला खेळाडूला तुम्ही उत्तर दिलं होतं की देशांतर्गत बाबींमध्ये नाक खुपसू नका. पण आज मात्र सचिन तुझं देशप्रेम कुठं गेलं आहे? तू सीबीआय-प्राप्तीकर विभागाच्या धाडी पडतील म्हणून दबावाखाली गेला आहेस का?” असा प्रश्नही बॅनरवर विचारण्यात आला आहे.

“क्रीडा विश्वातले तुम्ही देव माणूस आहात. भारतरत्नही आहात. पण क्रीडाविश्वातील काही महिला लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठवत आहेत, तेव्हा मात्र आम्हाला तुमच्यातील माणूस आणि माणुसकी कुठेच दिसून येत नाही”, असंही या बॅनरवर म्हटलं आहे. मुंबई प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रवक्ता रंजीता विजय गोरे यांचं नावही या बॅनरवर छापण्यात आलं आहे.

“सचिन तू तेव्हा नाक खुपसू नको म्हणालास, आता CBI मुळे..” कुस्तीपटूंच्या आंदोलनावरून तेंडुलकरच्या घराबाहेर काँग्रेसचे बॅनर

संजय राऊत म्हणतात, “कुस्तीपटूंवर अन्याय केंद्र सरकार…!”

दरम्यान, या बॅनर्सबाबत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यावर त्यांनी भाष्य केलं. “ही भूमिका पंतप्रधानांनी घेतली पाहिजे. केंद्र सरकारनं भूमिका घेतली पाहिजे. महाराष्ट्रात ठीक आहे. प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. महिला कुस्तीपटूंना न्याय मिळावा ही सगळ्यांचीच भूमिका आहे. पण त्यांना न्याय केंद्र सरकार नाकारत आहे”, असं म्हणत संजय राऊतांनी सचिन तेंडुलकरवर थेट बोलणं टाळल्याचं दिसून आलं.