लोकसभा निवडणुकीनंतर हा आनंदाचा क्षण आहे. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्या सगळ्या जाती-धर्माच्या देशभक्तांना मी धन्यवाद देतो आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मेळाव्यातल्या भाषणाला सुरुवात केली. माझी अवस्था रन झाल्यानंतर ज्या बॅट्समनला पाठवतात तशी झाली आहे. मी यशाचा मानकरी मी नाही तर तुम्ही आहात. शिवसेनाप्रमुखांनी दोन गोष्टी मला सांगितल्या होत्या, आपल्यात आत्मविश्वास असेल तर जगाच्या कोपऱ्यात मरण नाही. पण आत्मविश्वास आणि अहंकार यात फरक आहे. मी पाडू शकतो हा आत्मविश्वास आहे. पण मीच करु शकतो हा अहंकार आहे जो मोदींमध्ये आहे.

भाजपाला तडाखा बसलाय

भाजपाला तडाखा बसला आहे. त्यामुळे निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सुरु केलं की उद्धव ठाकरे पुन्हा एनडीएबरोबर जायचं. मी तुम्हाला विचारतोय जायचं ? नाही असं उत्तर गर्दीने दिलं. तुमचं तुम्ही बघा की..काय काय उघडं पडलं ते बघा. असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. घराणेशाही म्हटल्यावर थोडी घराणेशाही माझ्या शब्दांमध्ये येतेच. उद्धव ठाकरे एनडीएत जाणार अशा चर्चा, मग भुजबळ शिवसेनेत जाणार. भुजबळ माझ्याशी बोलले नाहीत. ते मंत्री आहेत ते बघतील काय करायचं. मात्र सांगड घालण्याचा आणि अपयश झाकण्याचा प्रयत्न भाजपाकडून केला जातोय. विषय वळवायचा कसं हे भाजपाला चांगलं कळलं आहे. पुन्हा निवडणूक झाली पाहिजे, कारण आज ज्यांचा सत्कार केला ते उद्या खासदार होतील. आपल्यावर आरोप केला जातोय की शिवसेनेला हिंदू मतं नाहीत, मुस्लीम मतं पडली आहेत. हो पडली आहेत, शिवसेनेने हिंदुत्व सोडलं म्हणत आहेत. डोमकावळे आज जमले आहेत त्यांची कावकाव सुरु झाली आहे. मी हिंदुत्व वगैरे सोडलेलं नाही.

चंद्राबाबू आणि नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत?

देशातली लोकशाही वाचवण्यासाठी हिंदुत्व सोडलंय असं म्हणत असतील तर नरेंद्र मोदींनी भाजपाने सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं आहे. २०१४ आणि २०१९ यावेळी जे फोटो आहेत ते बघा. आज भाजपाबरोबर कोण बसलं आहे चंद्राबाबू आणि नितीश कुमार ते काय हिंदुत्ववादी आहेत? आंध्रात चंद्राबाबूंनी मुस्लीम समाजाला वचनं दिलेली नाहीत का? नितीश कुमारांनी मुस्लीम समाजाला वचनं दिलेली नाहीत का? मुस्लीम समाज आमच्याबरोबर आहेच कारण आम्ही वार करु तर समोरुन करु, यांच्यासारखा पाठीत वार करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. मिंधे यांनी शहरी नक्षलवादाचा मुद्दा काढला. हुकूमशाही मोडा हा जर तुम्हाला आतंकवाद वाटतो का? देशाचं संविधान वाचवणं हा आतंकवाद वाटत असेल तर मी आतंकवादी आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुमचे जे बापजादे दिल्लीत बसलेत ते सरकारी यंत्रणेचा दुरुपयोग करत आहेत. रवींद्र वायकरांनी सांगितलं की माझ्यापुढे मार्गच नव्हता तुरुंगात जा की आमच्याकडे या. तो भ्रष्ट माणूस हे सांगतो हा तुमचा शासकीय नक्षलवाद नाही का? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

“उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खुळखुळा केला, मोदी आता ब्रांड नव्हे ब्रँडी म्हणूनच भाजपाचे लोक..”, संजय राऊतांची टोलेबाजी

भाजपा आणि शिंदेंना माझं आव्हान आहे, षंढ नसाल तर..

पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. नाहीतर षंढ म्हणून फिरा, विजेते म्हणून फिरु नका. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही.

मोदींनी विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करावा

मोदींना मी आमंत्रण देतोय, विधानसभेचा प्रचार आत्तापासून सुरु करा. मी आहे आणि तुम्ही आहात. नाव चोरायचं नाही, वडील चोरायचे नाहीत, पक्ष चोरायचा नाही, धनुष्यबाण बाजूला ठेवा आणि नवी निशाणी घ्या. मिंध्यांच्या वडिलांचा फोटो लावा आणि या समोर. माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट सांगता? षंढ कुठले. एक गोष्ट चांगली झाली. या निवडणुकीत आपले कोण आणि परके कोण हे समजलं. काहींना उद्धव ठाकरे नकोत म्हणून बिनशर्ट पाठिंबा दिला, म्हणजे उघड पाठिंबा दिला. असा टोलाही उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना लगावला. नाटक ही कला आहे, ती मोदींना जमते. आपल्या महाराष्ट्रातली निवडणूक दहा टप्प्यात झाली असती तर रोज यांची सालटी काढली असती.