उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघेही कपिल शर्मासारखे हास्य कलाकार आहेत. त्यांच्याकडून जी काही उत्तरं अनेकदा मिळतात ती हास्यास्पदच असतात असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्यांनी या दोघांची खिल्ली उडवली आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या दोघांनी चिटिंग केलं आहे असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

आणखी काय म्हटलं आहे किरीट सोमय्यांनी?

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे दोघंही कपिल शर्मा यांच्यासारखे आहेत. कारण ते हसू येईल असंच बोलत असतात. अनिल कदमने किती कोटींचा घोटाळा केला आहे यांनी हे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना माहित आहे का? अनिल परब यांनी समुद्राची जमीनही खाल्ली जेव्हा ठाकरे सरकार राज्यात होतं. तरीही आता मला नावं ठेवत आहेत. मला त्यांची उत्तरं ऐकून फक्त हसू येतं. परब आणि सदानंद कदम यांचे उद्योग माहित आहेत का? जनतेला लुटण्याचं काम अनिल परब यांनी केलं आहे.

sharad pawar, madha lok sabha constituency, ncp, bjp
माढ्यात शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
Sunita Kejriwal
अरविंद केजरीवालांचा तुरुंगातून संदेश; पत्नी सुनीता म्हणाल्या, “मुख्यमंत्र्यांनी आप आमदारांना आपापल्या मतदारसंघात…”
Sunita Kejriwal reads Arvind Kejriwal massage
अरविंद केजरीवाल यांचा तुरुंगातून संदेश; म्हणाले, “भाजपाचा द्वेष करू नका…”
ahmednagar lok sabha
विखे-पाटील यांच्या माफीनाम्यानंतरही भाजपमधील निष्ठावंतांची नाराजी कायम

आज संजय राऊत यांनी असं वक्तव्य केलं होतं की कुणाला अटक होणार? कुणाच्या घरी सीबीआय, ईडी जाणार आहे हे मुलुंडच्या पोपटलालला (किरीट सोमय्या) आधी कसं समजतं? असं संजय राऊत म्हणाले होते. त्यावर विचारलं असता किरीट सोमय्या म्हणाले पुन्हा एकदा हा हास्यास्पद प्रश्न आहे. किती महिन्यांपासून चौकशी सुरू आहे? माझ्यापेक्षा जास्त त्यांना माहित आहे त्यामुळे उत्तरं तयार ठेवतात. किरीट सोमय्यांकडे संपूर्ण महाराष्ट्रातून लोक येतात. मला ते माहिती देत असतात असं म्हणत किरीट सोमय्यांनी या प्रश्नाचीही खिल्ली उडवली आहे. मी जे बोलतो ते मला माहिती आहे.

अनिल परबना मी विचारलं होतं की तेरा क्या होगा अनिल परब. आता मी असं बोललो की उद्धव ठाकरे सांगणार बघा.. किरीट सोमय्या आधीच सांगत होता की अनिल परबला अटक होईल, त्याच्यावर कारवाई होईल. परब यांनी काळा पैसा कुठून आणला या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर कारवाई होणारच ना? मी जे बोलतो ते माझ्या लॉजिकनेच बोलतो. हसन मुश्रीफ यांच्यावर कारवाई झाली आहेच ती योग्यच आहे. असंही किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. हे लोकं घोटाळे करत आहेत मला लोक पुरावे आणून देतात. मी आज हे सांगू इच्छितो की महाराष्ट्रातल्या साडेबारा कोटी जनतेला आता बारामतीवर विश्वास उरलेला नाही. त्यामुळे ते माझ्याकडे पुरावे आणून देतात. राज्यातले शेतकरीही काही दिवसांपूर्वी मला भेटले होते असंही सोमय्यांनी सांगितलं.