महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सुट्टसाठी आसाममध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे. सरमा म्हणाले, “मी देशातील सर्व आमदारांना आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देतो. जर बंडखोर आमदार दीर्घकाळ आसाममध्ये राहिले तर माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे”. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही सुट्टीसाठी आसाममध्ये येण्याचे निमंत्रण देत असल्याचे सरमा म्हणाले.


गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये एकनाथ खडसेंसोबत शिवसेनेचे इतर बंडखोर नेते उतरले आहेत. यावर आसामचे मुख्यमंत्री सरमा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशातील सगळ्या आमदारांचे मी स्वागत करतो. कोणत्याही आमदाराला मी आसाममध्ये येण्यापासून थांबवू शकत नसल्याचे सरमा म्हणाले.

काँग्रेसचे एकनाथ शिंदेंना पत्र
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भूपेनकुमार बोरा यांनीही एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. “महाराष्ट्राचे निवडून आलेले सरकार पाडण्यासाठी सत्ताधारी आमदारांची गुवाहाटीत तुमची उपस्थिती, हा आसामच्या जनतेसाठी चांगला संदेश नाही. आसाम सध्या विनाशकारी पुराचा सामना करत आहे. पुराचा लोकांना फटका बसला आहे. आसाममध्ये सुमारे ५५ लाख लोकांना पुराचा फटका बसला असून १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

एकनाथ शिंदेंच्या समर्थक आमदारांमध्ये वाढ
एकनाथ शिंदे यांच्यातील गटबाजी वाढतच चालली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ शिवसेनेचे आमदार कमी होत चालले आहेत. आता शिवसेनेकडे केवळ १६ आमदारांचा पाठिंबा आहे. तर एकनाथ शिंदेंना ३५ शिवसेना आमदार आणि ७ अपक्ष असे ४२ आमदारांचे समर्थन आहे.