Uddhav Thackeray On Jay Gujrat Slogan By Eknath shinde : पहिलीच्या इयत्तेपासून हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्यानंतर आज विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र आले. आज (५ जुलै) मुंबईतील वरळी येथे हा विजयी मेळावा पार पडला. या मेळाव्यात दोन्ही नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी ‘जय गुजरात’ अशी घोषणा देणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली.

शिंदे काय म्हणाले होते?

पुण्यातील गुजराती समुदायाकडून उभारण्यात आलेल्या जयराज स्पोर्ट्स व कन्व्हेन्शन सेंटरचं शुक्रवारी (४ जुलै) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमत भाषण संपवताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात’ अशी घोषणा दिली. या घोषणेनंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.

झुकेगा नही साला

दरम्यान वरळी येथील विजयी मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देखील शिंदे यांना लक्ष्य केले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “तो एक गद्दार काल बोलला जय गुजरात… किती लाचारी करायची? तो पुष्पा पिक्चर तुम्ही पाहिला आहे. दाढीवरती हात फिरवून म्हणायचं झुकेगा नहीं साला, तसं हे गद्दार म्हणतात उठेगा नहीं साला. कुछ भी बोलो उठेगाही नहीं… अरे कसे उठणार आहे का तुझ्याकडे उठण्यासारखं.. म्हणजेच विचार वगैरे असं मी म्हणतोय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘जय गुजरात’ अशी घोषणा देणारा बाळासाहेब ठाकरे यांचा पाईक असू शकत नाही असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. “हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांचा पाईक असू शकेल? आपला मालक आला म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात म्हणणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पाईक असू शकेल? मगा आता उघडा डोळे बघा नीट… कारण आता डोळे उघडले नाहीत तर पुन्हा कधी उघडण्याची वेळ येणार नाही, ते कायमचे मिटून जातील. आता आलेली जाग जर जाणार असेल तर मग मात्र स्वतःला मराठी आईची मुलं म्हणू नका.