मी भाजपाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही. त्यांचं हिंदुत्वाच्या नावाखाली जे काही थोतांड चाललं होतं त्यामुळे मी त्यांना सोडलं. आमचं हिंदुत्व कुणावर अन्याय करणारं हिंदुत्व नाही. मोदींचं जे काही चालतं ते म्हणजे निवडणूक जिंकेपर्यंत सबका साथ आणि निवडणूक जिंकल्यावर मित्राचा विकास. हे आमचं हिंदुत्व नाही. ज्या कठीण काळात शिवसेनेने तुम्हाला साथ दिली त्याच शिवसेनेवर हे उलटले. आमदार, नगरसेवक निवडून आले त्याचंही अप्रुप वाटायचं. वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हाही आनंद झाला. शिवसेना आणि भाजपामध्ये युतीच्या काळात सत्ता किती काळ आमच्याकडे होती? पण कठीण काळात आम्ही साथ दिली होती. पण हे माडीवर चढले आणि आम्हाला लाथ मारु लागले. हा आपमतलबीपणा देशाला घातक आहे. असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) जागर महाराष्ट्र धर्माचा या मेळाव्याला उपस्थिती दर्शवली होती. त्यावेळी त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावर तसंच भाजपावर टीका केली.

अच्छे दिनचा नारा दिला होता त्याचं काय झालं?

अच्छे दिनचा नारा दिला होता. अच्छे दिनचा नारा शाकाहारी माणसाच्या गळ्यातल्या आश्वासनाचं हाड बनला. दुर्दैवाने आम्हीही त्यांच्याबरोबर तेव्हा होतो. शेतकऱ्यांशी मध्यंतरी बोललो तेव्हा शेतकरी म्हणाले की तुमच्यामुळे आमचं कर्ज माफ झालं वगैरे. मी काही उपकार केले नाहीत. आत्ताच्या सरकारने ज्या योजना आणल्या. असं उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) म्हटलं आहे.

Raj Thackeray Uddhav Thackeray (1)
Raj Thackeray : “शिवसेना उबाठाच्या होर्डिंगवर जनाब बाळासाहेब ठाकरे…”, राज ठाकरेंचा संताप; एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
Raj Thackeray on Code of Conduct
Raj Thackeray : “एकदा एक कॅमेरावाला बाथरूमपर्यंत…”, राज ठाकरेंनी सांगितली पूर्वीच्या आचारसंहितेच्या काळातील गंमत!
Raj Thackeray on Viral Video
Raj Thackeray : “लोकांच्या मनोरंजनाकरता बाई भोजपुरी गाण्यावर नाचतेय”, ‘त्या’ व्हायरल VIDEO वर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया!
Raj Thackeray
Raj Thackeray : ‘अजित पवारांबरोबर बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना म्हणणारे …’, राज ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका
Raj Thackeray on shivsena and ncp split
Raj Thackeray Speech : शिवसेनेवर कुणाचा अधिकार? राज ठाकरेंनी स्पष्ट शब्दांत मांडली भूमिका; राष्ट्रवादी काँग्रेस फुटीवरही केलं भाष्य!
sada sarvankar marathi news (1)
“उद्धव ठाकरेंसारखा माणूस राजकारणात सापडणार नाही”, सदा सरवणकरांच्या नावाने पोस्ट व्हायरल; स्वत: स्पष्टीकरण देत म्हणाले…
Uddhav Thackray Warns to Independent Candidates to take Back The Name
Uddhav Thackeray : “अपक्ष किंवा बंडखोरांनी अर्ज मागे घेतले नाहीत तर…”, उद्धव ठाकरेंचा इशारा

योजनांचा पाऊस आणि अंमलबजावीणचा दुष्काळ

योजनांचा पाऊस आणि अंमलबजावणीचा दुष्काळ ही सध्याची स्थिती आहे. त्याचा समारंभ करत आहेत, पैसे देऊन लोक आणत आहेत. फुकट साड्या वाटत आहेत. मग महिलांना विचारतात पैसे मिळाले का? तू काय घरचे पैसे वाटतो का? हक्काचे पैसे ढापले, सरकार स्थापन करताना ५० खोके घेतले. गद्दारांना ५० खोके आणि बहिणीला फक्त १५००? फोडाफोडी करताना लाज वाटली नाही आणि आता हे आमचेच पैसे आम्हाला देऊन गद्दारी करायला लावतो आहेस का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) नाव न घेता एकनाथ शिंदेंवर टीका केली.

हे पण वाचा– Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची टीका, “दिल्लीत बसलेल्या दोन गुजराती ठगांनी देशात आणि गुजरातमध्ये…”

७० हजार कोटींचा घोटाळाही आता लाजतो

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले, ” जे काही समारंभ चालले आहेत, ते बघा कसे चालले आहेत जसं काही यांनी केलं. मी कधीही कुठला कार्यक्रम केला नाही कारण मी जे काही शेतकऱ्यांसाठी समाजातल्या घटकांसाठी केलं ते कर्तव्य म्हणून केलं. करोना काळात जे काम केलं ते कामही पुसण्याचा प्रयत्न केला जातो आहे. भाजपाशासित राज्यात माझ्या महाराष्ट्राचं काम बघा जर माझा कारभार चांगला नसेल तर कुणाला तोंड दाखवणार नाही. करोना काळातला घोटाळा काढता. पीएम केअर फंडाच्या घोटाळ्याबाबत कुणी काही बोलतच नाही. यांनी एवढे घोटाळे केलेत की ७० हजार कोटींचा घोटाळा लाजतो, शी.. मी काय घोटाळा आहे का? मी तर सुट्ट्या पैशांचा घोटाळा, एवढे मोठे घोटाळे झाला आहे. सगळा आपल्या लुटीचा पैसा आहे. असंही उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

दिल्लीतले ठग महाराष्ट्र लुटत आहेत

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रासाठी सुरत लुटली होती. मात्र केंद्रात बसलेले दोन ठग हे महाराष्ट्र लुटत आहेत. लुटीचा पैसा वापरुन जाहिरात करत आहेत. तारका, तारे घेऊन आमच्या डोळ्यांसमोर काजवे चमकवत आहेत. सरकारी जाहिराती छापून आणतात. फेक नरेटिव्ह जाहिरातींच्या माध्यमातून हे बिघाडलेलं सरकार दाखवतं आहे. २०१४ ला मोदींनी चाय पे चर्चा केली होती. आता तेव्हा चहा कितीला मिळायचा आणि आत्ता किती मिळतो ते जरा तपासा, जीएसटी किती लागला तेपण तपासा. मुलगी शिकली प्रगती, पुढे काय १५०० देऊन घरी बसवली. त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय? कोव्हिड काळात जे सामंज्यस करार झाले होते ते सगळे उद्योग गद्दारांनी गुजरातला पाठवले. या दोन ठगांना विचारायचं आहे का आमच्या सुखात मीठ कालवत आहात? ” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला आहे.