ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Thackeray ) पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी कार्यकर्त्यांनी संबोधित केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मोदींसमोर वळवणारे मांडूळ असा केला आहे. तर अमित शाह यांना पुन्हा एकदा अहमदशाह अब्दाली आणि दरोडेखोरांची उपमा दिली आहे. मिंधे सरकार नुसतंच घोषणांचा पाऊस पाडतं आहे आणि अंमलबजावणीच्या नावाने सगळा दुष्काळ आहे असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले आहेत.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“दुबार मतदार नोंदणीचा मु्द्दा आत्ता राजन विचारेंनी उपस्थित केला आणि तो योग्य आहे. जिल्हाधिकाऱ्यांना सांगूनही काही केलेलं नाही. तीन महिने थांबा, सरकारी जिल्हाधिकारी मिंध्याचे कलेक्टर मी कुठे पाठवतो बघा. या चांडाळ चौकडीला तुरुंगाचे गज मोजायला लावू. ही काही गंमत नाही. ठाणे उभं राहिलं त्यामागे शिवसेनाप्रमुखांचं प्रेम आणि शिवसैनिकांची अपार मेहनत आहे. ही मेहनत झाली नसती तर मिंधेंची दाढी उगवलीच नसती.” अशी टीका उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केली

sanjay raut reaction on amit shah mumbai statement
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
narayan rane on devendra fadnavis
देवेंद्र फडणवीसांनी सुरत लुटीबाबत केलेल्या विधानावर नारायण राणेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
smriti irani praise rahul gandhi
Smriti Irani : टीकेची एकही संधी न सोडणाऱ्या स्मृती इराणी यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक; म्हणाल्या, “आता त्यांचे राजकारण..”
sanjay raut
Sanjay Raut : “ही मिंध्यांनी पोसलेली अफजलखानाची अवलाद, अशा लोकांना तर…”; दीपक केसरकरांच्या ‘त्या’ विधानावरून संजय राऊत आक्रमक!
jitendra awhad replied to raj thackeray
Jitendra Awhad : “राज ठाकरे फक्त बडबड करतात, त्यांना…”; शरद पवारांवरील ‘त्या’ टीकेला जितेंद्र आव्हाडांचे प्रत्युत्तर
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

एकनाथ शिंदे म्हणजे दुतोंडी मांडूळ

“नमकहराम टूची उत्सुकता आम्हाला आहे, नागाचा अपमान मला करायचा नाही पण हे मांडूळ आहे गांडूळ नाही दुतोंडी मांडूळ. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांडूळ आहे. हे (एकनाथ शिंदे) तिकडे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही, फोन आला की यांची पँट खराब होते. जसे याल तसे या असा फोन आला की पळतात. नशीब पँट घातलेली असते.” अशी बोचरी टीका उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) एकनाथ शिंदेंवर केली.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंवर ठाण्यातल्या भाषणात जोरदार टीका केली आहे. (फोटो सौजन्य-एकनाथ शिंदे, फेसबुक पेज)

लबाडी करुन ठाणे जिंकलं

“लबाडी करुन ठाणे जिंकलं आहे. मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलो आहे. सर्वकाही पळवलं. जोर जबरदस्ती आणि पैशांचं वाटप झालं तरीही निष्ठेने सव्वापाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूला राहिले. वैशालीताई सारखी साधी कार्यकर्ती. समोर मिंध्याचं कार्टं होतं, प्रचंड पैसा ओतला तरीही जिंकता येत नाही म्हटल्यावर विश्वगुरुंना बोलवावं लागलं त्यामुळे मला वैशालीताईचं कौतुक आहे. लांड्यालबाड्या केल्या आणि काही जागा जिंकल्या. ४८ मतांनी आपला मुंबईत पराभव होऊ शकतो का? मुंबईसह, ठाणे, कोकण आपलंच आहे.” असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

हे पण वाचा- ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या सभास्थळी मनसेचा राडा, कारची काच फोडली, शेण व बांगड्या फेकल्या

मोदींसमोर जाऊन लोटांगण घालणं म्हणजे…

महाराष्ट्राची वाताहात झाली तरीही चालेल पण मोदींसमोर जाऊन लोटांगण घाल हे बाळासाहेबांचे विचार नाहीत. जे तोतया आहेत त्यांची वळवळ आपल्याला थांबवावी लागेल. जे काही चाललं आहे ते बघा. जे येतं आहे ते सगळं गुजरातला वळवलं जातं आहे. माता-भगिनींना १५०० रुपयांची भीक देत आहात का? आम्हाला हक्काचं पाहिजे. शेतकरीही हक्काचं मागतो आहे, भीक नाही मागत. शेतकऱ्याला विचारा तो सांगेल मला कष्टाचे पैसे हवेत. हक्क मारायचा, स्वाभिमान मारायचा आणि कोपरावर गूळ लावायचा. गुजरातमध्ये प्रकल्प गेले तेव्हा हेच मिंधे बोलले होते याहून मोठ्ठा प्रकल्प महाराष्ट्राला आणू. आला का एक तरी प्रकल्प? एकही प्रकल्प आला नाही.असं उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) म्हणाले.

लाडकी बहीण योजनेवरुनही सरकारला टोला

उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) पुढे म्हणाले, “अजूनही राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसंच जी लाडकी बहीण योजना काढली आहे त्याबाबत मी मराठवाड्यातल्या महिलांना विचारलं की काय ताई १५०० रुपये मिळत आहेत खुश आहात ना? त्यावर त्या ताई मला म्हणाल्या अहो १५०० रुपयांनी घर चालतं का? त्यात काय होतं आहे? १५०० रुपयांत माझ्या मुलाच्या शाळेची फी पण भरली जात नाही. अशी कितीतरी मुलं राज्यात आहेत. आता तर आयुर्विम्यावरही जीएसटी लावला आहे. जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. जिंदगी के बाद भी जीएसटी कशासाठी भरायचा? कुणाच्या खिशात जाणार?” असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी ( Uddhav Thackeray ) विचारला.