एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षामध्ये दोन गट पडले आहेत. एकीकडे शिवसेना पक्षावरील वर्चस्वावरून संघर्ष सुरू असताना दुसरीकडे शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. राऊत सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. असे असताना संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनी ही कारवाई सुडाच्या भावनेतून केल्याचा आरोप केला आहे. तसेच या कारवाईला आम्ही घाबरणार नाही. उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवू, असे सुनिल राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा >> “माझ्यासमोर ज्या याचिका…” शिंदे गट-उद्धव ठाकरेंतील संघर्षावर विधानसभा अध्यक्षांचे महत्त्वाचे विधान

EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)
“दोन प्रादेशिक पक्षांकडे अजेंडा अन् झेंडाही नाही, त्यांच्यामुळे काँग्रेसची…”, मुख्यमंत्र्यांचा मविआला टोला
Vijay Vadettiwar
“शिंदे गटाची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, त्यांचे निम्मे आमदार…”; विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
vijay shivtare
निनावी पत्राद्वारे शिवतारेंच्या माघारीवर टीका; पवारांच्या विरोधातील ५ लाख ८० हजार मतदारांनी करायचे काय?
bjp claim on thane lok sabha constituency
ठाण्यातून संजीव नाईक? मतदारसंघावरील भाजपचा दावा कायम; मुख्यमंत्र्यांच्या समर्थकांमध्ये अस्वस्थता

“हे सगळं सुडाच्या भावनेतून करण्यात आले आहे. लोक हजारो-लाखो कोटी रुपये बुडवतात. मात्र एक कोटी सहा लाख रुपयांसाठी संजय राऊत यांना लक्ष्य करण्यात आले आहे. मात्र आम्ही घाबरणार नाही. आम्ही संघटना आणखी मजबूत करू. परत एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवून दाखवू. परत एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे यांना बसवू,” असे सुनिल राऊत म्हणाले.

हेही वाचा >> “…तेव्हा आदित्य ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न,” दीपक केसरकरांनी पुन्हा घेतले नारायण राणेंचे नाव

“संजय राऊतांचा भोंगा सुरू होता त्यामुळेच बाकीच्यांना मंत्रिपद मिळाले आहे. एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री या भोंग्यामुळेच झाले. हा भोंगा सुरू ठेवला म्हणूनच महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. एकनाथ शिंदेंना मंत्रिपद भेटले नसते तर त्यांच्यासोबत ४० आमदार गेले असते का?” असा सवालही त्यांनी केला.

हेही वाचा >> संजय राऊतांच्या अटकेनंतर उद्धव ठाकरेंचा ‘दैनिक सामना’ संदर्भात मोठा निर्णय

“संजय राऊत ६१ वर्षांचे आहेत. त्यांचे २० ते २२ वर्षे शिक्षणात गेले असतील. उरलेल्या ४० वर्षांमध्ये त्यांनी कोणतेच काम केले नाही का. ते नुसते घरी बसले होते का? भारतीय जनता पार्टी तसेच शिंदे गट या सर्वांना संजय राऊत कसे वर आले याबाबत माहिती आहे. मात्र ते संजय राऊत यांना घाबरतात. संपूर्ण महाराष्टाचा त्यांना पाठिंबा आहे,” असेदेखील सुनिल राऊत म्हणाले.