भाजपाचे पाच राज्यांपैकी चार राज्यांमधील निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर महाराष्ट्रामध्येही ठिकठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. निवडणुका झालेल्या पाच राज्यांपैकी उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपाला बहुमत मिळालं आहे. गोव्यामधील कानकोना मतदारसंघामध्ये भाजपाच्या प्रचाराचं काम पाहणारे कल्याणचे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनीही गोव्यातील विजयानंतर कार्यकर्त्यांसोबत जल्लोष साजरा केला. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांवर घराणेशाहीचा आरोप करत टीका केलीय. मुख्यमंत्री पद घराणेशाहीमुळे उद्धव ठाकरेंना मिळाल्याचा टोलाही गायकवाड यांनी लगावलाय.

नक्की वाचा >> Election Results: “महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडू शकतं”

Bihar Lok Sabha Election Nitish Kumar Tejashwi Yadav Narendra Modi
तेजस्वींचा उदय, तर नितीश कुमारांचा अस्त; बिहारच्या राजकारणात ‘मोदी फॅक्टर’ चालेल का?
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
gadchiroli lok sabha seat, Minister dharamraobaba aatram, Claims, vijay waddetivar will join bjp, waddettiwar denies
विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ
Lok Sabha elections in Telangana between Congress and BJP
तेलंगणमध्ये काँग्रेस, भाजप यांच्यात चुरस

दोन वर्षात एकदाही मंत्रालयात आले नाहीत.
“मागच्या पूर्ण दोन अधिवेशांमध्ये मुख्यमंत्री आले नाहीत. मागच्या दोन वर्षांमध्ये मुख्यमंत्री मंत्रालयामध्ये येऊ शकेल नाहीत. राज्याचा कारभार घरात बसून करत असाल तर हे चुकीचं आहे. राज्याचा कारभार मंत्रालयात येऊन केला पाहिजे पण मुख्यमंत्री मंत्रालयात येऊ शकले नाहीत. फक्त घराणेशाहीच्या जोरावर त्यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं आणि ते आता सरकार चालवत आहेत,” असं गायकवाड म्हणाले.

नक्की वाचा >> Election Results: ‘हा २०२४ चा कौल’ म्हणणाऱ्या मोदींना प्रशांत किशोर यांचा टोला; म्हणाले “साहेबांना हे ठाऊक…”

…म्हणून भाजपाला एकहाती सत्ता दिली
पुढे बोलताना गायकवाड यांनी, “पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता आलीय. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने भाजपाला मतदान केलेलं. युतीमधील शिवसेनेलाही मतदान केलेलं. भाजपाची सत्ता येईल या अपेक्षेने मतदान करण्यात आलेलं. पण हे २०-२० टक्क्यांवाले ६० टक्कांमध्ये पास झाले. आम्ही एकट्याने ४० टक्के मार्क घेतले. त्यामुळे या लोकांनी एकत्र येत आम्हाला नापास केलं. जनतेनं आम्हाला नापास केलेलं नाही. आपली घराणेशाही चालवण्यासाठी हे पक्ष एकत्र आले. राष्ट्रवादीचे घराणेशाही, काँग्रेसची घराणेशाही, शिवसेनेची घराणेशाही चालवण्यासाठी लोकांचा विश्वासघात केला. त्यामुळे देशातील जनतेने भाजपाचा विश्वासघात होऊ नये म्हणून एकहाती सत्ता दिलीय. चार राज्यांमध्ये एकहाती सत्ता भाजपाच्या हातात देण्याचा निर्णय जनतेने घेतल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे,” असं म्हटलंय.

नक्की वाचा >> Election Results: काँग्रेसमध्ये पुन्हा फूट?; पाच राज्यांमधील दारुण पराभवानंतर G-23 नेत्यांनी बोलवली बैठक

पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर…
“ईडी ही काही देशाने किंवा रागाने कोणाच्या मागे लावलेली नाही. ज्यांनी चुका केल्यात, भ्रष्टाचार केलाय, दोन नंबरचे धंदे केलेत त्यामधील भ्रष्टाचार उघड करण्याचं काम ईडीच्या हातात आहे. त्यामुळे या चौकशा होतात. यात चौकशीमध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई होते, मग तो कोणीही असो. देशाच्या पंतप्रधानांनी जरी चुकी केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते. त्यामुळे कुठल्या नेत्यावर किंवा मंत्र्यावर कारवाई होणे योग्यच आहे,” असं मत त्यांनी व्यक्त केलं.

नक्की वाचा >> Election Results: पाच राज्यांतील निकालांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?; शिवसेना म्हणते, “माकडांच्या…”

मलिक यांच्याविरोधातील कारवाईचं समर्थन
“मुंबईसारख्या जागेवर २५ रुपये स्वेअर फूटाचे जागा नवाब मलिक यांनी घेतली. मुंबईमधील जागा अगदी ती कचरा टाकायची जागा असली तरी २५ रुपये स्वेअर फूट दराने विकत घेता येत नाही. त्यांनी ही जागा रोख व्यवहाराच्या माध्यमातून विकत घेतली. देशद्रोही लोकांनी, देशात बॉम्बस्फोट करणाऱ्या त्या पैशाचा गैरवापर केला,” असं सांगत नवाब मलिक यांच्याविरोधातील कारवाईचं समर्थन गायकवाड यांनी केलं.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: अखिलेश घाबरले, राजनाथांनी टाळले, पण योगींनी करुन दाखवले; आता एवढे विक्रम होणार योगींच्या नावे

पक्षाचे मानले आभार…
“कानकोना मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली. तेथील भाजपाचा उमेदावार एक हजार मतांनी निवडून आलाय. मी नवा असूनही मला या कामासाठी संधी देण्यात आली म्हणून मी पक्ष, देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठांचे आभार मानतो,” असंही गायकवाड यांनी म्हटलंय.