सोलापूर : सोलापूरकरांना विरोध डावलत अखेर उजनी धरम्णाचे पाणी इंदापूर, बारामती तालुक्याला देण्याचा निर्णय घेण्यात आला. इंदापूर व बारामतीसाठी ७२५० हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यासाठी लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या दत्तात्रेय भरणे यांनी सोलापूरवर अन्याय करत स्वत:च्या इंदापूर तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी देण्याच्या या निर्णयाच्या विरोधात जिल्ह्यात नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. उजनीचा हा पाणीप्रश्न पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

दत्तात्रेय भरणे हे इंदापूरचे आमदार तर सोलापूरचे पालकमंत्री आहेत. त्यांनी गेल्या वर्षी इंदापूर व बारामतीसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा प्रयत्न चालविला असता त्यास सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी कडाडून विरोध केला होता. त्यामुळे परिस्थितीचा विचार करून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी या योजनेचा प्रस्ताव रद्द केला होता. उजनी धरणातील मूळ पाणी आराखडय़ाला हात न लावता तेथील सांडपाणी नेण्याचे नियोजन असल्याचा खुलासा त्यावेळी भरणे यांनी केला होता. परंतु तो खुलासा निराधार आणि खोटय़ा माहितीवर आधारित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Daighar Garbage, Daighar, Thane,
ठाणे : डायघर कचरा प्रश्न पेटणार, मतदानावर बहिष्कार घालण्याची तयारी
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
beed district loksabha marathinews, dhananjay munde marathi news
मराठा समाजाचा रोष कमी करण्यासाठी धनंजय मुंडे यांचा बैठकांवर जोर, मराठा भवन बांधून देण्याचे आश्वासन
pune, srinivasan services trust, sparrow conservation campaign
या चिमण्यांनो परत फिरा…! शेकडो गावातील गावकरी घालताहेत साद

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंदापूरच्या लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजनेस सन २०२१-२२ च्या दरसूचीवर आधारित ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता दिली आहे. ही माहिती स्वत: पालकमंत्री भरणे यांनी दिली आहे. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना ही महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळांतर्गत उर्वरित महाराष्ट्र या विभागात येते. या योजनेचा उद्भव उजनी धरण पाणलोट क्षेत्रात इंदापूर तालुक्यातील कुंभारगाव येथून असून पहिल्या टप्प्यात ५०.१० मीटर, दुसऱ्या टप्प्यात अनुक्रमे ५१.२० मीटर व ७३.२० मीटर शीर्ष उंचीपर्यंत पाणी उचलले जाणार आहे. यातून इंदापूर तालुक्यात दहा गावांतील ४३३७ हेक्टर आणि बारामती तालुक्यात ७ गावांतील २९१३ हेक्टर असे एकूण ७२५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.

यासाठी ०.९० अब्ज घन फूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे. या योजनेच्या लाभक्षेत्राच्या उत्तर बाजूस नवीन मुठा उजवा कालवा तसेच दक्षिण बाजूस नीरा डाव्या कालव्याचे लाभक्षेत्र असून या दोन्ही कालव्यांच्या मध्ये सिंचनापासून वंचित क्षेत्रास या योजनेद्वारे सिंचनाचा लाभ होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ही योजना भीमा प्रकल्पाचा भाग असल्याने या योजनेस प्राधिकरणाची मान्यता घेण्याची आवश्यकता नाही. योजनेचा खर्च मोठे व मध्यम पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, १९० सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूक, पाटबंधारे विकास महामंडळाना भाग भांडवली अंशदान, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान गुंतवणूक या लेखाशिर्षांखाली टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाकडी-निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्यासाठी दत्तात्रेय भरणे यांनी आपली राजकीय कारकीर्द पणास लावली होती. हा प्रश्न सुटला नाही तर येत्या विधानसभा निवडणुकीत मते मागण्यासाठी येणार नाही अशी जाहीर गर्जनाही त्यांनी केली होती. या योजनेला विरोध वाढण्यासाठी त्यांचे स्थानिक राजकीय प्रतिस्पर्धी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सोलापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांना फूस लावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

गैरसमज नको..

इंदापूर व बारामतीच्या दुष्काळी भागात उजनी धरणातून पाणी नेताना सोलापूरवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. लाकडी-निंबोडी योजनेसाठी उजनीतून पाणी नेणे हे नियोजितच आहे. यात पाणी पळविण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. सोलापूरकरांनी गैरसमज करून घेऊ नये.

    – दत्तात्रेय भरणे, पालकमंत्री, सोलापूर