Ward-wise Winner Candidate List 2026 Ulhasnagar UMC Election Results: उल्हासनगरमध्ये भारतीय जनता पक्षाला शह देण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेली स्ट्रॅटेजी फेल ठरली. महापालिकेत भाजपाने जोरदार मुसंडी मारत सर्वाधिक ३७ जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे साई पक्ष आणि ओमी टीमसोबत युतीचा प्रयोग करणाऱ्या शिंदेसेनेला ३६ जागांवर विजय मिळवता आला. यामुळे केवळ दोनच जागांवर विजय मिळवणारी वंचित बहुजन आघाडी आता किंगमेकरच्या भूमिकेत आली आहे.

उल्हासगर महापालिकेच्या ७८ जागांसाठी भाजपाने ३७ जागांवर विजय मिळवला, शिंदेसेनेला ३६, वंचित बहुजन आघाडी ०२, साई पक्ष ०१, ओमी टीम ०१ आणि काँग्रेसला ०१ जागेवर यश मिळाले. शिंदेंच्या शिवसेनेबरोबर युती न झाल्याने भाजपाने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय भाजपाच्या पथ्यावर पडला. दरम्यान, पालिकेत सत्ता स्थापनेसाठी ४० जागांचा मॅजिक आकडा कोणताच पक्षाला गाठता आला नाही.

उल्हासनगर महानगरपालिकेत निवडून आलेल्या उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे:

प्रभाग १

अर्चना करंकाळे (भाजपा)
पूजा भोईर (शिंदेसेना)
भावना ओवळेकर (भाजपा)
दिलीप गायकवाड (शिंदेसेना)

प्रभाग २

हरीश कनोजिया (भाजपा)
मीना कौर लबाना (भाजपा)
संध्या मराठे (भाजपा)
जमनुदास पुरस्वानी (शिंदेशेना)

प्रभाग ३

संगीता कंदारे (शिंदेसेना)
वंदना भदाणे (शिंदेसेना)
चरणजीतसिंग कौर भुल्लर (शिंदेसेना)
राजेंद्र सिंग भुल्लर (शिंदेसेना)

प्रभाग ४

नाना बागुल (शिंदेसेना)
सुरेखा आव्हाड (भाजपा)
शोभाताई जाधव (भाजपा)
कलवंत सिंग सहातो (शिंदेसेना)

प्रभाग ५

दिलीप जग्यासी (शिंदेसेना)
मीना आयलानी (भाजपा)
सीमा कलानी (शिवसेना)
नंद छापूर (भाजपा)

प्रभाग ६

विकी लबाना (शिंदेसेना)
प्रेरणा माखीजाणी (शिंदेसेना)
जया माखिजा (शिंदेसेना)
महेश सुखरमानी (शिंदेसेना)

प्रभाग ७

संगमित्रा हजारे (शिवसेना)
अश्विनी कमलेश निकम (शिवसेना)
दुर्गा दिनेश राय (शिवसेना)
सुचित्रा सिंग (भाजपा)

प्रभाग ८

छाया अडसूळ (भाजपा)
ज्योती पाटील (भाजपा)
संजय सिंग (भाजपा)
राजेश वधारिया (भाजपा)

प्रभाग ९

डिंपल ठाकूर (शिंदेसेना)
दीपा पंजाबी (भाजपा)
आकाश चक्रवर्ती (शिंदेसेना)

प्रभाग १०

भावना गिडवाणी (भाजपा)
रविंद्र निकम (शिवसेना)
राजेंद्र चौधरी (शिवसेना)
राजश्री चौधरी (शिवसेना)

प्रभाग ११

प्रीती मखिजा (भाजपा)
रवी जग्यासी (भाजपा)
कविता लाल पंजाबी (भाजपा)
प्रविण गोदू कृष्णानी (भाजपा)

प्रभाग १२

सविता तोरणे (अपक्ष – शिवसेना पुरस्कृत)
कैलास म्हात्रे (भाजपा)
ज्योती बठिजा (भाजपा)
दीपक सिरवानी (भाजपा)

प्रभाग १३

सूरज सोनकांबळे (शिंदेसेना)
ज्योत्स्ना जाधव (शिंदेसेना)
कांता पवार (शिंदेसेना)
प्रदीप गोडसे (शिंदेसेना)

प्रभाग १४

लीलाबाई आशान (शिंदेसेना)
राजेश चानपूर (शिंदेसेना)
साक्षी सुर्वे (शिंदेसेना)
चंद्रशेखर यादव (शिंदेसेना)

प्रभाग १५

संगीता सपकाळे (शिंदेसेना)
इंदिरा पाटील (शिंदेसेना)
अमर जग्याशी (शिंदेसेना)
अरुण अशान (शिंदेसेना)

प्रभाग १६

दिप्ती दुधानी (साई)
अनंता रूपचंदानी (भाजपा)
कांचन लुंड (भाजपा)
शेरी लुंड (भाजपा)

प्रभाग १७

रवींद्र परमार (भाजपा)
नैसी उदासी (भाजपा)
सुहाना जसवानी (भाजपा)
अमर लुंड (भाजपा)

प्रभाग १८

अंजली साळवे (काँग्रेस)
सुरेख सोनवणे (वंचित)
विकास खरात (वंचित)
राजेश वानखेडे (भाजप)

प्रभाग १९

विपुल मयेकर (भाजपा)
मीना सोंडे (शिंदेसेना)
रत्नमाला दुर्गे (भाजपा)
राजू गोपलानी (भाजपा)

प्रभाग २०

सुनीता काकडे (भाजपा)
ललिता पाटील (भाजपा)
प्रधान पाटील (भाजपा)

दरम्यान, पालिकेत उद्वध ठाकरे यांची शिवसेना, राज ठाकरेंची मनसे आणि दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादीला खातेही उघडता आले नाही. शिंदेसेनेला उल्हासनगरमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी वंचितला सोबत घ्यावे लागणार आहे. ४० चा जादुई आकडा गाठण्यासाठी साई पक्ष ०२, ओमी टीम समर्थक अपक्ष ०१ आणि वंचित ०२ अशी मोट शिंदेसेनेला बांधावी लागणार आहे.