उमेश कोल्हे हत्याकांड : मुख्य सूत्रधाराला ७ जुलै पर्यंत पोलीस कोठडी

आरोपीला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली.

jail
( संग्रहित छायचित्र )

अमरावती : येथील पशुवैद्यकीय व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार शेख इरफान शेख रहीम ऊर्फ इरफान खान याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला शनिवारी रात्री नागपुरातून अटक करण्यात आली होती.

आरोपीला अमरावती जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करताना अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. यावेळी न्यायालय परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस बंदोबस्तात आरोपीला नेण्यापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकाने रविवारी सकाळी शहर कोतवाली पोलीस ठाण्यात चौकशी केली. न्यायालयाने इरफानला येत्या ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

पोलिसांनी इरफानला या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मानले आहे. याआधी पोलिसांनी मुदस्सीर अहमद ऊर्फ सोनू रजा शेख इब्राहिम (२२), शाहरुख पठाण ऊर्फ बादशाह हिदायत खान (२५), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तस्लिम (२४), शोएब खान ऊर्फ भुऱ्या साबीर खान (२२), अतिब रशीद आदिल रशीद (२२) आणि युसूफ खान बहादूर खान (४४) या आरोपींना अटक केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Umesh kolhe murder mastermind remanded in police custody till july 7 amy

Next Story
पंजाबमधील आठ किलो सोन्याच्या चोरीचा छडा लावण्यात कवटेमहाकाळ पोलिसांना यश; मुख्य सूत्रधार अद्याप फरार
फोटो गॅलरी