सोलापूर : गेली नऊ वर्षे अन्नदान सेवेत असलेल्या ‘जयहिंदू फूड बँके’च्या वतीने सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात गरीब रुग्ण व नातेवाइकांना रोज जेवणाची मोफत व्यवस्था केली जाणार आहे. त्याचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यासह शेजारच्या उस्मानाबाद, लातूर, बीड, बीदर, विजापूर, गुलबर्गा, बागलकोट आदी भागातून गोरगरीब रुग्ण वैद्यकीय उपचारासाठी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल होतात. अनेक वेळा हे रुग्ण आणि त्यांच्या सोबत असलेल्या नातेवाइकांची आर्थिक अडचणींमुळे दररोज पोटभर जेवणाअभावी आबाळ होते. ही अडचण लक्षात घेऊन ‘जय हिंदू फूड बँके’ने रुग्णालयात गरजू रुग्ण व नातेवाइकांसाठी रोजच जेवणाची सोय केली जात असल्याचे ‘जय हिंदू फूड बँके’चे संस्थापक-अध्यक्ष सतीश तमशेट्टी यांनी सांगितले.

या उपक्रमाचा प्रारंभ पोलीस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते झाला. या उपक्रमाचे स्वागत करून बैजल यांनी, शासकीय रुग्णालयात वैद्यकीय उपचारासाठी परगावातून येणारे बरेच गोरगरीब रुग्ण व नातेवाईक परिस्थितीने अक्षरश: गांजलेले असतात. दररोज जेवणासाठी त्यांच्याकडे पैसे नसतात. परंतु आपली अडचण ते बोलून दाखवू शकत नाहीत. त्यांच्या सेवेसाठी ‘जय हिंदू फूड बँके’ने हाती उपक्रम मानवतावादी आहे, असे उद्गार काढले. या वेळी डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि डॉ. विजय पवार यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून त्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. या उपक्रमासाठी जय हिंदू फूड बँक व रुग्णालय प्रशासन यांच्यात करार करण्यात आला.

Victim education
सामूहिक बलात्कारामुळे शिक्षण सुटले, न्यायालय म्हणाले…
Project of Dutt Factory
कोल्हापूर : दत्त कारखान्याच्या क्षारपड जमीन सुधारणा पथदर्शी प्रकल्पावर शासनाकडून शिक्कामोर्तब; नापीक जमिनीवर पिकांची हिरवाई फुलली
treatment in private hospitals
गरीब रुग्णांना खासगी, धर्मदाय रुग्णालयात उपचार मिळणार, राज्यस्तरीय विशेष मदत कक्ष कार्यान्वित
traffic problem in Pune
पुण्यातील बिघडलेल्या वाहतूक समस्येची उच्च न्यायालयाकडून दखल, परिस्थितीचा फेरआढावा घेण्याचे पुणे पोलीस आयुक्तांना आदेश

या वेळी संस्थेचे मार्गदर्शक सुरेश तमशेट्टी, अध्यक्ष सतीश तमशेट्टी ,उपाध्यक्ष प्रा. विक्रमसिंह बायस, सुधीर तमशेट्टी, अनिकेत सरवदे, गजानन यन्नम, शुभम बल्ला, नवल अंध्याल, गोपाल अलकुंटे, विशाल लिंबोळे, विजय मिरेकर, योगी वळसंगे, भागेश तमशेट्टी, राजश्री तमशेट्टी आदींची उपस्थिती होती. समाजातील संवेदनशील मंडळींनी स्वत:च्या किंवा घरातील मंडळींच्या वाढदिवस किंवा इतर औचित्याने रुग्णालयातील गरजू रुग्ण व नातेवाइकांना जेवणाची सेवा देण्यासाठी हातभार लावावा. त्यासाठी ‘जय हिंदू फूड बँके’शी (भ्रमणध्वनी ९६६५८०८५७१) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.