वाई:जर शरद पवार मला ओळखत नाहीत तर शरद पवार कोण मी सुद्धा त्यांना ओळखत नाही अशी जोरदार टीका त्यांनी केली ज्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जाच नाही अशा नेत्यांच्या वक्तव्यांना किती गांभीर्याने घ्यायचे अशी उपरोधिक शैलीत टीका केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांनी बुधवारी साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
मोदी ॲट नाईन उपक्रमांतर्गत अजय मिश्रा यांनी सातारा येथे पत्रकारांशी संवाद साधला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मिश्रा यांनी उत्तरे दिली .राष्ट्रवादी अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यामध्ये मी चाळीस वर्ष दिल्लीच्या राजकारणामध्ये आहे त्यामुळे कोण अजय मिश्रा मी त्यांना ओळखत नाही असे वक्तव्य केले होते या वक्तव्याची मिश्रा यांना पत्रकारांनी आठवण करून त्यावर प्रतिक्रिया विचारलली असता ते म्हणाले प्रत्येक नेते आपापल्या पद्धतीने नेहमीच बोलत असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार त्यांचा पक्ष महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आहे त्यामुळे त्यांची वक्तव्य किती गांभीर्याने घ्यायची हा सुद्धा प्रश्न आहे. जर शरद पवार मला ओळखत नसतील तर मी सुद्धा त्यांना ओळखत नाही शरद पवार यांनी माझ्या मतदारसंघातून येऊन तेथून निवडणूक लढवून दाखवावी असे आवाहन मिश्रा यांनी दिले यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले अतुल भोसले विक्रम पावसकर आदी उपस्थित होते.




हेही वाचा >>> साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची तडकाफडकी बदली
महाराष्ट्रामध्ये भाजपची बांधणी मजबूतरित्या सुरू असून येथील ४८ लोकसभेच्या जागा निवडून आणण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप हा आकडा गाठल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी खात्रीपूर्वक सांगितले पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला अजय मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामाची यादीच वाचून दाखवली
भारतामध्ये लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी केला आहे या प्रश्नाच्या संदर्भाने मिश्रा यांना विचारले असता ते म्हणाले राहुल गांधी यांना हा देश आपली स्वतःची जहागिरी वाटते. सत्ता असल्यामुळे त्यांची मक्तेदारी होती. मात्र आता सत्ता नसल्यामुळे विरोधकांची पंचायत झाली असून त्यांची वक्तव्य नैराश्यामधून होत आहेत भाजपने गेल्या नऊ वर्षांमध्ये महागाईचा दर हा गेल्या वीस वर्षाच्या तुलनेने ४.८ इतका कमी ठेवण्यात यश मिळवले आहे म्हणजे देशाचा विकास होत आहे हा त्याचा अर्थ असल्याचे मिश्रा यांनी सांगितले,
हेही वाचा >>> “ऐकलं तर ठिक, नाहीतर…”, कोल्हापुरातील तणावारून मनसेचा कडक इशारा
दिल्ली येथे जंतर मंतरवर महिला कुस्तीपटूंचे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे या प्रश्नाच्या संदर्भात बोलताना मिश्रा म्हणाले या विषयावर बोलणे म्हणजे कोर्टाच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यासारखे आहे कोर्टाचा निकाल यामुळे प्रभावित होऊ शकतो जे काही प्रक्रिया आहे ती कोर्टाच्या माध्यमातूनच निकाली काढली गेली पाहिजे त्यामध्ये जे काही तथ्य असतील ती न्यायालयाच्या प्रक्रियेतून तपासून घेतली जातील त्यामुळे या विषयावर मी जास्त बोलू शकत नाही असे करून महिला कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा विषय त्यांनी टाळला .कोल्हापूर येथील प्रक्षोभक वक्तव्यावरून झालेल्या दंगली संदर्भात बोलताना ते म्हणाले महाराष्ट्रात सरकार भाजप आणि शिंदे यांच्या युतीचे सरकार आहे. ते सक्षमपणे निर्णय घेऊ शकतात यासंदर्भात ते सर्व घटनांचा आढावा घेऊन दोशीनां निश्चितच शासन करतील असा विश्वास व्यक्त करत ओरिसा रेल्वे दुर्घटनेच्या संदर्भातही त्यांनी संवेदनशीलता प्रकट केली या प्रश्नासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री आणि प्रशासन अत्यंत संवेदनशीलपणे हे काम करत असून पीडितांना योग्य तो न्याय देण्यासाठी आम्ही बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.