scorecardresearch

केंद्रीयमंत्री रामदास आठवलेंच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार-२०२२’ चे वितरण

मदर्स डे निमित्त रामदास आठवलेंनी सादर केली कविता, म्हणाले…

(संग्रहीत छायाचित्र)

`शिवरायांचे गीत आपण गाऊ कारण, आमची प्रेरणा आहे माता जिजाऊ’ असे उत्स्फूर्त काव्यपक्ती सादर करत, आज (रविवार) केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातृदिना निमित्ताने आईबद्दल आपल्या भावना सांगलीत व्यक्त केल्या.

सांगलीत ‘राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार-२०२२’ चे वितरण केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या हस्ते पार पडले. सांगलीतील राजर्षी शाहू शिक्षण संस्था, इनाम धामणी, सांगली या संस्थेच्यावतीने हा राजमाता जिजाऊ आदर्श आई पुरस्कार सोहळा पार पडला. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी केले.

यावेळी भाषणाच्या सुरुवातीलाच मदर्स डे निमित्त मंत्री रामदास आठवले यांनी आई वरती कविता म्हणत आईविषयी कृतज्ञता व्यक्त केली. “आई मला नोकरी करण्यासाठी सांगत होती, मात्र माझा तसा मूड नव्हता.” असेही ते म्हणाले.

तसेच, अपघातात दरवर्षी दीड लाखापेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू होतो. या अपघातात अनेकवेळा एकत्रित फिरण्यास गेलेल्या तरुणाचा मृत्यू होतो. यावेळी त्या तरुणांच्या आईला जे दुःख होते ते फार असते. त्यामुळे असे अपघात रोखण्यासाठी काही करता येईल काय, यावर माझी आणि नितीन गडकरी यांच्यात नेहमी चर्चा होते असे आठवले म्हणाले. या कार्यक्रमास काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, माजी महापौर सुरेश पाटील व मान्यवर उपस्थित होते. समारंभात अकरा महिलांना राजमाता जिजाऊ आदर्श माता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Union minister ramdas athavale presented a poem on the occasion of mothers day in sangli msr

ताज्या बातम्या