सोलापूर : सांगोल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे माजी आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या पुतण्याच्या मोटारीवर अज्ञात माथेफिरू व्यक्तींनी दगड मारून मोटारीच्या मागची काच फोडली. मात्र या घटनेबद्दल स्थानिक पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झाली नाही. तसेच कथित घटनेनंतर नुकसानग्रस्त मोटारही लगेचच हलवून दुरुस्तीसाठी सांगलीला नेण्यात आली. दुसरीकडे पोलिसांत तक्रार न देता शहाजीबापू पाटील यांना संरक्षण देण्याची मागणी त्यांच्या समर्थकांनी केली आहे. दरम्यान, या घटनेचे गूढ वाढले असता शेकापचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी या घटनेचा निषेध नोंदवून सखोल चौकशीची मागणी केली आहे.

ॲड. शहाजीबापू पाटील यांचे पुतणे तथा शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे युवा सेना जिल्हा संपर्कप्रमुख सागर सुभाष पाटील यांची मोटार दुपारी शहाजीबापू पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर उभी असताना कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी मोटारीच्या पाठीमागे दगड मारून काच फोडल्याचे सागर पाटील यांचे म्हणणे आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…रेल्वेच्या परिसरात पुरुषांचे लज्जास्पद वर्तन…महापालिकेकडे कोणी केली तक्रार?

विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर ॲड. शहाजीबापू पाटील यांचे गेल्या पाच वर्षापासून असलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सागर पाटील यांच्या मोटारीवर दगड टाकण्याच्या कथित घटनेनंतर त्यांच्या समर्थकांनी बैठक घेऊन शहाजीबापू पाटील यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. दगड फेकून मोटारीचे नुकसान केल्याच्या घटनेनंतर त्याबाबत लगेचच सांगोला पोलीस ठाण्यात संबंधितांकडून तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. परंतु तशी तक्रार दाखल झाली नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त मोटारीचा पंचनामाही होऊ शकला नाही. तसेच घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्येही मोटारीवर दगड टाकल्याचे दृश्य स्पष्टपणे दिसून आले नाही. दुसरीकडे पोलिसांत तक्रार दाखल न करता आणि पंचनामा न करता नुकसानग्रस्त मोटार दुरुस्तीसाठी घटनास्थळावरून हलवून सांगलीकडे पाठविण्यात आल्यामुळे या घटनेविषयीचे गूढ कायम आहे. यानिमित्ताने २००९ सालच्या सांगोला विधानसभा निवडणुकीत एका उमेदवाराने केलेल्या बनावट गोळीबार प्रकरणाला उजळणी मिळाली.

हेही वाचा…शनिवारची सुट्टी वाहतूक कोंडीत… कोठे घडला प्रकार?

दरम्यान, शहाजीबापू पाटील यांच्या समर्थकांनी सांगोल्यात गुंडगिरी आणि दहशत वाढल्याचा आरोप केला आहे. त्याची दखल घेऊन शेकापचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे बंधू तथा पक्षाचे नेते डॉ. अनिकेत देशमुख यांनी या कथित घटनेचा निषेध नोंदविला आहे. या घटनेची सखोल चौकशी करून सत्य उजेडात आणावे, अशी मागणी केली आहे.

Story img Loader