इस्लामपुरात पोलीस कर्मचाऱ्याकडून तरुणावर अनैसर्गिक अत्याचार; व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत घेतली खंडणी

पोलीस कर्मचाऱ्याने आधी मला तुझ्या मैत्रिणीसोबत संभोग करायचा आहे असे धमकावले होते

Unnatural atrocities on youth by police personnel in Islampur

इस्लामपूरमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयीन तरुणावर पोलीस कर्मचाऱ्याने अनैसर्गिक अत्याचार केल्याचे व खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार महिन्याभरानंतर समोर आला आहे. हणमंत कृष्णा देवकर (वय ३४) असे गुन्हा दाखल झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून या घटनेमुळे सांगली पोलीस दलात खळबळ उडाली आहे. याबाबत इस्लामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

इस्लामपूर पोलीस ठाण्यात नेमुणकीस असलेले पोलीस कर्मचारी  देवकर व आणि एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत २८ ऑक्टोबरला पहाटे ३ वाजता गस्त घालत असताना पिडीत मुलगा त्याच्या  मैत्रिणीला भेटून पुन्हा वस्तीगृहात जात होता. त्यावेळी आरोपी हणमंत देवकर त्याच्या सहकाऱ्याने त्याला अडवून आत्ता कोठून आलास इथे काय करतो असे विचारले. त्यावर पिडीत तरुणाने मैत्रिणीला भेटून आलो आहे असे सांगितले. त्यावेळी आरोपी देवकरने त्या मुलाकडे संपूर्ण माहीती मागितली. त्यावेळी त्या मुलाने त्याचा मोबाईल नंबर देवकरला दिला. २९ ऑक्टोबर रोजी त्या तरुणाला आरोपी हणमंत देवकर याने फोन करून कॉलेजच्या गेटवर भेटायला ये असे सांगितले. त्यानंतर पिडीत तरुण हा देवकरला भेटायला गेला. त्यावेळी देवकरने त्या मुलाला प्रेमप्रकरणावरून धमकावून पैशाची मागणी करून याबाबत घरी सांगेन असे धमकावले. पिडीत मुलाने घाबरून कॉलेजमधील मित्रांकडून ४००० रुपये घेवून हणमंत देवकरसी दिले. पण आरोपीचे यामुळे समाधान झाले नाही.

आरोपीने त्यांनतर त्या मुलाला तुझ्या मैत्रिणीचा नंबर मला दे आणि  तिला माझ्यासोबत संभोग करायला सांग असे सांगितले . त्यावेळी त्या मुलाने तसे करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यावेळी आरोपी हणमत देवकरने पिडीतास  तू मला तुझ्या मैत्रिणीसोबत जर संभोग करायला देत नसशील तर मी तुझ्या सोबत संभोग करायचा आहे असे म्हटले. आरोपीने पिडीत मुलाला त्याच्या रुमवर घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर पिडीत तरुणाने त्याने त्याच्या मित्राला दुसऱ्या रूममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर आरोपी हणमंत देवकरने पिडीत मुलाबरोबर अनैसर्गिक संभोग केला व त्याचे व्हिडीओ शूटिंग केले.

२१ ऑक्टोबरला पुन्हा आरोपी हणमंत देवकर याने त्या मुलास फोन करून कॉलेजच्या गेटवर बोलावून घेतले आणि संभोगाची मागणी केली. आरोपीने यावेळी मोबाईलमधील अनैसर्गिक संभोगाचा व्हिडीओ दाखविला व  तू आज माझ्यासोबत आला नाहीस तर हा व्हिडीओ मी व्हायरल करेल अशी धमकी दिली.

हा सर्व प्रकार त्या मुलाने त्याच्या मित्राला सांगितला. त्यानंतर त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. रविवारी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आरोपी पोलीस कॉन्स्टेबल हणमंत देवकर यास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस खात्यांतर्गत कडक कारवाई करुन तात्काळ अहवाल पाठविला जाणार आहे अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Unnatural atrocities on youth by police personnel in islampur abn

Next Story
गैरव्यवहारात अडकलेल्या मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत -खडसे