मुंबई : राज्यात करोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील १५ दिवस महत्त्वाचे असून, शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. विशेषत: मुंबई, ठाणे, पुणे अशा महानगरांमध्ये दैनंदिन बाधितांचा आकडा झपाटय़ाने वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेसह सरकारचीही चिंता वाढली आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी तातडीने करोना नियंत्रण कृती गटाशी चर्चा केली. ठाकरे यांच्या वर्षां निवासस्थानी झालेल्या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह कृती गटाचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने आदी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use masks follow protocols to stop new covid 19 wave cm uddhav thackeray zws
First published on: 03-06-2022 at 03:49 IST