Vande Bharat : कोल्हापूर ते पुणे या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. शालेय मुलांसह, पत्रकार आणि काही कोल्हापूकरांनी या ट्रेनने प्रवास केला. आता कोल्हापूर ते मुंबई अशीच ट्रेन सुरु करा अशी अपेक्षा काही कोल्हापूरकरांनी व्यक्त केली आहे. तसंच आज पुणे ते हुबळी या दरम्यानही वंदे भारत ( Vande Bharat ) ट्रेन सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती होती.
कशी धावणार वंदे भारत एक्स्प्रेस?
वंदे भारत ( Vande Bharat ) एक्स्प्रेस सोमवार, गुरुवार आणि शनिवार या तीन दिवशी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी सुटेल, दुपारी १ वाजून ३० मिनिटांनी पुणे स्थानकांवर पोहचेल.
प्रत्येक बुधवार, शुक्रवार, रविवार या दिवशी दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी वंदे भारत ( Vande Bharat ) ट्रेन सुटेल जी संध्याकाळी ७.४० ला कोल्हापुरात पोहचेल.
कुठे असणार थांबे?
वंदे भारत ट्रेनला ( Vande Bharat ) मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.
आसन क्षमता कशी आहे?
एकूण ८ डब्यांची वंदे भारत ट्रेन, त्यात सात चेअर कार डबे, एक एक्झिक्युटिव्ह क्लास डबा
पाच डब्यात ७८ आसन क्षमता आहे, तर रेल्वे इंजिन जवळच्या दोन डब्यांमध्ये ४४ आसन क्षमता
एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये ५२ आसन क्षमता आहे.
एकूण आसन क्षमता ५३० प्रवासी
तिकिट दर प्रतिव्यक्ती ५६० रुपये, एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी ११३५ रुपये
तिकिट दरांमध्ये चहा, जेवण आणि पाणी मिळणार
खासदार महाडीक काय म्हणाले?
वंदे भारत ट्रेन ( Vande Bharat ) आता कोल्हापूर ते पुणे या शहरांमध्ये धावणार आहे. तरी लवकरच मुंबईपर्यंत सुरु केली जावी अशी कोल्हापूरकरांची अपेक्षा आहे.
कोल्हापूर पुणे वंदे भारत ( Vande Bharat ) सकाळी सव्वाआठच्या सुमारास कोल्हापूरातून निघेल त्यानंतर मिरजमध्ये ९ वाजता, सांगलीत सव्वा नऊ वाजता, किर्लोस्करवाडीत ९.४२, कराड १०.०७, सातारा १०.४७ आणि पुण्यात दीड वाजता पोहोचणार आहे. पुण्यातून परतणारी गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटेल. साताऱ्यात ४.३७ कराड ५.२५, किर्लोस्करवाडीत ५.५०, सांगली ६.१८ , मिरजेत ६.४० तर कोल्हापुरात ७.४० ला पोहोचणार आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला तीन वंदे भारत ( Vande Bharat ) ट्रेनची भेट दिली आहे. विशेषतः पुणे कोल्हापूर, पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद अशा तीन ट्रेनमुळे महाराष्ट्रातले प्रवासी आहेत त्यांचा प्रवास गतिमान आणि सुखकर होणार आहे. वंदे भारत ट्रेन भारताची शान आहे. भारताने आपल्या देशात आंतरराष्ट्रीय ट्रेन तयार केली आहे. जगातल्या ट्रेन्समध्ये जशा सुविधा प्रवाशांना मिळतात तशा प्रकारच्या सुविधा या वंदे भारत ट्रेनमध्ये भारतीयांना मिळत आहेत. त्यामुळेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी आभार मानतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.