अलिबाग : अलिबाग तालुक्यातील वरसोली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जनावरांचे लम्पी रोगापासून संरक्षण व्हावे, याकरिता लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सर्व पशुपालकांनी या मोहिमेत सहभागी होत आपल्या जनावरांचे लसीकरण करून घेतले. वरसोली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच मिलिंद कवळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती अलिबाग पशुधन विकास अधिकारी  डॉ. बागुल यांच्या उपस्थितीत वरसोली पंचक्रोशीतील लम्पी आजाराने ग्रस्त पशूंचे संरक्षण करण्यासाठी व कोणत्याही प्रकारचे लम्पी रोगाची लागण होऊ नये म्हणून सर्व गुरांना लसीकरण करण्यात आले.

 तसेच या आजाराबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. वरसोली हद्दीतील नाईक आळी, ताड आळी, बापदेव आळी, नांदे परिसरातील सुमारे १३० गोवंशांना लस देण्यात आली. या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य हर्षल नाईक, संजय कवळे यांच्यासह ग्रामपंचायतीचे कर्मचारी सहभागी झाले होते.