सातारा : माण तालुक्यातील जवान सचिन काटे यांना वीरमरण

पाच वर्षापुर्वी सचिन काटे भारतीय सेनेत भर्ती झाले होते.

वाई : माण तालुक्यातील संभूखेड गावचे जवान सचिन विश्वनाथ काटे (वय २४ ) यांना देशसेवा बजावत असताना राजस्थान येथे वीरमरण आले. या घटनेमुळे माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. संभूखेड येथील जवान सचिन विश्वनाथ काटे यांना देशसेवा बजावत असताना राजस्थानमध्ये बुधवारी (दि.२० ऑक्टोबर) रोजी रात्री वीर मरण आल्याची माहिती भाऊ रेवन काटे यांना राजस्थान लष्कराच्या युनिटने दिली. 

पाच वर्षापुर्वी सचिन काटे भारतीय सेनेत भर्ती झाले होते. त्यांचा लहान भाऊ देखील रेवन विश्वनाथ काटे हा लहान भाऊ आसाम येथे देशसेवा बजावत आहे. आई-वडिल हे गावी शेती करतात. सचिन काटे यांना वीर मरण आल्याची माहिती मिळताच माण तालुक्यासह संभूखेड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या मागे आई वडील आणि लष्कर सेवेत असलेले भाऊ असा परिवार आहे.

सचिन काटे यांचे पार्थिव पुणे येथे लष्कराचे जवान घेऊन येत असून उद्या शनिवारी (दि.२२ऑक्टोबर) रोजी संभूखेड या जन्म गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Veermaran sachin kate jawan from maan taluka indian army srk

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या