Nana Patekar Death Marathi News : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी निधन झाले. मृत्यूसमयी ते ७५ वर्षांचे होते. गोव्यातील मणिपाल रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आले. केवळ मनोरंजन नव्हे तर राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात सहज वावरणार्या या मनस्वी कलावंतावर गुरुवारी रात्री पुण्यातील डोणजे येथील फार्महाऊस येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचा मुलगा मल्हार पाटेकरने त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
नाना पाटेकरांच्या घरी नेमकं काय घडलं?
नाना पाटेकर यांना मध्यरात्री २ वाजून ३० मिनिटांनी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला त्यासंदर्भात मेसेज केला होता. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. मित्राने मेसेज पाहताच ते पहाटे चार वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तत्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णलायातून रुग्णवाहिका मागवली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचं वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.
नाना पाटेकरांची पत्नी निलाकांती पाटेकर, मुलगा मल्हार पाटेकर अंत्यदर्शनावेळी अत्यंत भावूक झाले होते. त्यांचे सर्व जवळचे नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार यावेळी हजर होते. प्रत्येकाच्या आश्रूचा बांध फुटला होता. नाना पाटेकरांचे जवळचे मित्र मकरंद अनासपुरे यांनाही अश्रू अनावर झाले.
नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली
“अतिशय मोजक्या अभिनेत्यांमध्ये अशी तीव्रता, अनोखे व्यक्तिमत्त्व आणि अजोड स्क्रीन प्रेझेन्स असतो, जो नाना पाटेकर यांच्याकडे होता. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेत अष्टपैलूत्व आणि सर्जनशीलता आणली आणि आपल्याला अशी अजरामर पात्रे दिली जी पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील. ते त्यांच्या स्पष्ट आणि रोखठोक मतांसाठीही ओळखले जात होते; आपल्या तत्त्वांसाठी उभे राहताना आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहताना त्यांनी कधीही आढेवेढे घेतले नाहीत”, असं पतंप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
“हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील नाना पाटेकर यांचे योगदान अथांग होते. त्यांच्या जाण्याने कलाविश्वात कधीही न भरून निघणारी एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या, मित्रांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. ओम शांती”, असं म्हणत त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
भारतीय चित्रपटसृष्टीचे मोठे नुकसान- राष्ट्रपती
“ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने अत्यंत तीव्र दुःख झाले आहे. आपल्या ताकदीच्या आणि मनाला भिडणाऱ्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी मानवी अनुभूतींचे विविध पैलू पडद्यावर जिवंत केले. त्यांनी साकारलेल्या भूमिकांनी लोकांच्या मनावर आणि मेंदूवर एक न मिटणारी छाप सोडली. सामाजिक सेवेप्रती असलेल्या त्यांच्या बांधिलकीतून वंचित आणि उपेक्षित घटकांबद्दलची त्यांची तळमळ दिसून येत असे. त्यांचे जाणे हे भारतीय चित्रपटसृष्टीचे खूप मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी असून त्यांच्याप्रती आपल्या भावपूर्ण संवेदना व्यक्त करते”, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या.
नितीन गडकरींकडून श्रद्धांजली
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, “भारतीय चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. नानांचे आणि माझे अतिशय जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. आपल्या दमदार अभिनयाने पाच दशकांहून अधिक काळ नाना पाटेकर यांनी मराठी व हिंदी चित्रपटांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण संवाद शैलीने त्यांनी चित्रपटातील अनेक पात्रे अजरामर केली व आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे जाणे ही भारतीय चित्रपटसृष्टीची मोठी हानी आहे. ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून पाणी संरक्षण, संचयन क्षेत्रांत महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात त्यांनी केलेले कार्य उल्लेखनीय आणि महत्त्वपूर्ण आहे. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी त्यांनी दिलेला मदतीचा हात अनेक कुटुंबांचा आधार बनला. नाना एक उत्तम कलाकार-अभिनेते असण्याबरोबरच समाजाप्रती संवेदनशील असलेले एक व्यक्तिमत्त्व होते. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो. ॐ शांती.”
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पहाता त्यांचे अंत्यसंस्कार “शासकीय इतमामात” करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले आहे.
नाना पाटेकर यांचा अभिनय प्रवास
नाना पाटेकर यांनी रंगभूमीवरून (थिएटर) सुरुवात केल्यानंतर ‘गमन’ (१९७८) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘परिंदा’ (१९८९), साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि ‘क्रांतीवीर’ (१९९४), चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी ‘अग्नी साक्षी’, ‘खामोशी: द म्युझिकल’, ‘अब तक छप्पन’, ‘अपहरण’, ‘राजनीती’, ‘वेलकम’ आणि मराठी चित्रपट ‘नटसम्राट’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये कौतुकास्पद भूमिका केल्या. ते एक दिग्दर्शक, लेखक आणि २०१३ चे ‘पद्मश्री’ पुरस्कार विजेते देखील होते.
पाटेकर यांनी अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या ‘वेलकम’ (२००७) या विनोदी चित्रपटात आपल्या अभिनयाची एक वेगळीच बाजू दाखवली, ज्यामधील त्यांनी साकारलेली गँगस्टर ‘उदय शेट्टी’ची भूमिका त्यांच्या सर्वात लक्षात राहिलेल्या कामगिरींपैकी एक बनली. ‘वेलकम बॅक’मध्येही त्यांनी ही भूमिका पुन्हा साकारली. मराठी चित्रपटसृष्टीत, पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ (२०१६) चित्रपटात एका निवृत्त रंगभूमी नटाची भूमिका साकारून आपल्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम अभिनय सादर केला. त्यांनी ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे – द रिअल हिरो’ या चित्रपटातही भूमिका केली, यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार (मराठी) मिळाला.
ते एक दिग्दर्शकही होते; त्यांनी १९९१ मध्ये ‘प्रहार: द फायनल अटॅक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तसेच या चित्रपटात अभिनय आणि त्याचे लेखनही त्यांनी केले होते. पाटेकर यांना २०१३ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते आणि ते तीन राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे मानकरी होते. पाटेकर हे ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून सामाजिक कार्याशीही जोडलेले होते. त्यांच्या निधनाने भारतीय चित्रपटसृष्टीतील जवळपास पाच दशकांच्या कारकिर्दीचा अंत झाला आहे.
