सोलापूर : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमची (जीबीएस) लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना, याची लागण झालेल्या सोलापुरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूचे नेमके अंतिम कारण वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट होणार असले, तरी रुग्णाला जीबीएसची लागण झाल्याचे निदान ११ जानेवारीला झाले होते, त्यामुळे हा जीबीएसचा पहिला मृत्यू ठरण्याची शक्यता आहे.

मृत सनदी लेखापाल मूळचा सोलापूरचा असून तो पुण्यात धायरी परिसरातील एका कंपनीत नोकरी करीत होता. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या ११ जानेवारी रोजी त्यास गुइलेन गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) आजाराची लागण झाल्याचे निदान झाले होते. त्यास उलट्यांचा त्रास वाढला होता. त्याने पुण्याऐवजी स्वतःच्या गावी, सोलापुरात येऊन वैद्यकीय उपचार घेणे पसंत केले. त्यास एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू असताना प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्यास पाच दिवस अतिदक्षता विभागात हलविण्यात आले होते. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अतिदक्षता विभागातून बाहेर काढण्यात आले होते. परंतु पुन्हा प्रकृती बिघडली आणि अखेर त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, भाऊ असा परिवार आहे. दरम्यान, रविवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात मृतदेह न्यायवैद्यक तपासणीसाठी हलविण्यात आला असता मृतदेहाची चार तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने न्यायवैद्यक तपासणी केली. यात रुग्णाचा मृत्यू ‘जीबीएस’मुळे झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष काढण्यात आला. रासायनिक पृथ:करण अहवाल पंधरा दिवसांनी प्राप्त होणार असून त्यावेळी मृत्यूचे अंतिम कारण स्पष्ट होणार आहे.

Vakrangee Technology, Dinesh Nandwana Death ,
मुंबई : ईडीची निवासस्थानी शोधमोहीम सुरू असताना व्यावसायिकाचा मृत्यू
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
new ST buses in phased manner 110 buses have been made available
जेजुरी बसस्थानकात चालकाचा हृदयविकाराने मृत्यू
Three more gbs patients died Two deaths reported in Pune and one in Pimpri Chinchwad
पुण्यास पिंपरी-चिंचवडमध्ये ‘जीबीएस’मुळे आणखी तिघांचा मृत्यू; राज्यातील रुग्णसंख्या १४० वर
36 year old man from Pimplegurav died due to GBS complications and pneumonia
पिंपरी : ‘जीबीएस’मुळे युवकाचा मृत्यू
Guillain-Barré Syndrome in Kolkata
‘जीबीएस’चे आता महाराष्ट्राबाहेरही थैमान; कोलकातामध्ये दोन मुलांचा मृत्यू
number of Guillain Barre Syndrome GBS patients in state has reached 101 of which 16 patients are on ventilators
जीबीएसच्या रुग्णांत मोठी वाढ अन् एकाचा मृत्यू! रुग्णसंख्या शंभरपार; निम्म्याहून अधिक ‘आयसीयू’त
senior citizen dies in st bus accident
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

‘जीबीएस’मुळे मृत्यू; प्राथमिक निष्कर्ष

संबंधित रुग्णाला एका सहकारी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना अखेर मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात न्यायवैद्यक तपासणी केली असता तसेच संबंधित रुग्णालयाकडून मृत रुग्णावर केलेल्या वैद्यकीय उपचाराची कागदपत्रे पाहता ‘गुइलेन बॅरे सिंड्रोम’च्या (जीबीएस) आजाराने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. रासायनिक पृथ:करण्याचा अहवाल पंधरा दिवसांनी आल्यानंतर मृत्यूचे अंतिम कारण समजू शकेल. – डॉ. संजीव ठाकूर, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

Story img Loader