Video : ‘मराठी माणसाच्या न्याया’ची व्याख्या काय?; याच मुद्द्यावरुन अडकलीये भाजपा-मनसे युतीची गाडी

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती होणार का यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे.

Video BJP MNS Alliance and Marathi Manus issue
नाशिकमधील भेटीनंतर भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा नव्याने रंगू लागलीय

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिकमधील भेटीनंतर भाजपा-मनसे युतीची चर्चा पुन्हा नव्याने रंगू लागली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही युती होणार का यासंदर्भात चर्चांना उधाण आलं आहे. मात्र याचसंदर्भात महिन्याभरापूर्वी आपली भूमिका स्पष्ट करताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेत सविस्तर भाष्य केलं होतं. विशेष म्हणजे त्यावेळी त्यांनी ‘मराठी माणसाच्या न्याया’ची व्याख्या ही दोन्ही पक्षांसाठी वेगळी असल्याचे संकेत दिले होते. जाणून घेऊयात ते काय म्हणाले होते…

हिंदुत्वाकडे झुकल्यानंतरही मनसेसोबत भाजपाची युती का होऊ शकली नाही? त्याचीही काही कारणं आहेत… जाणून घेऊयात भाजपा-मनसे युतीत अडथळा ठरणारं कारण…

‘लोकसत्ता’च्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवादमालेतील राज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी येथे क्लिक करा. तर देवेंद्र फडणवीस यांची संपूर्ण मुलाखत तुम्ही येथे क्लिक करुन पाहू शकता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Video bjp mns alliance and marathi manus issue scsg

ताज्या बातम्या