Video : पंतप्रधान मोदींबद्दल शरद पवारांच्या ‘त्या’ विधानाला फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

आदिवासी संमेलनात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते? तो व्हिडिओ देखील फडणवीसांनी शेअर केला आहे.

(संग्रहित, प्रातिनिधिक छायाचित्र)

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गडचिरोलीमध्ये पत्रकारपरिषदेत बोलताना आदिवासींच्या मुद्द्य्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. त्यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे ज्या आदिवासी संमेलनातील मोदींच्या भाषणाचा शरद पवारांनी उल्लेख केला, त्या संमेलनात पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले होते, हे दर्शवणारा व्हिडिओ देखील देवेंद्र फडणवीस यांनी पुरावा म्हणून ट्विटरवर शेअर केला आहे. तसेच, शरद पवारांचं ट्विट देखील फडणवीसांनी आपल्या ट्विटसोबतच जोडलं आहे.

“ ज्यांच्या हातात देशाची सूत्रं आहेत त्या पक्षाच्या नेत्यांची भूमिका ही तेल ओतून आग वाढविण्याची होती ”

शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर साधलेल्या निशाण्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की, “आपल्यासारख्या मोठ्या नेत्यांनी वस्तुस्थिती जाणून घेत आणि पूर्ण माहिती घेत बोलले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संबोधनात जनजाती आणि आदिवासी असे शब्द वापरले आहेत. आपली ही भाषा आदिवासी बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न आहे आणि ज्यांच्यासोबत आपण सभा घेत आहात, अशांची किमान माहिती घ्यायला हवी की त्यांच्यावर कशाप्रकारचे गुन्हे दाखल आहेत!”

काय म्हणाले आहेत शरद पवार? –

“आज देशाची सूत्रे भाजपाकडे आहेत. दोन दिवसांपूर्वी भोपाळ येथे आदिवासी संमेलन झाले होते. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. पण मला आश्चर्य वाटलं, तिथे कुठेही आदिवासी हा शब्द वापरला नाही. त्याऐवजी वनवासी असा शब्द वापरण्यात आला. वनवासी हा शब्द आदिवासींना मंजूर नाही.” असं शरद पवार आज पत्रकारपरिषदेत म्हणाले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले होते ? –

“देशाच्या लोकसंख्येच्या जवळपास १० टक्के असुनही, दशकांपर्यंत जनजातीय समाजाला त्यांची संस्कृती त्यांच्या सामर्थ्याला पूर्णपणे दुर्लक्षित केलं गेलं. आदिवासींचं दुःख, त्यांच्या यातना, मुलांचे शिक्षण, आदिवासींचं आरोग्य त्या लोकांसाठी काहीच महत्वाच नव्हतं. मित्रांनो भारताच्या सांस्कृतिक यात्रेत जनजातीय समाजाचं योगदान अतूट राहीलं आहे. तुम्हीच सांगा, जनजातीय समाजाच्या योगदानाशिवाय प्रभू रामाच्या जीवनात यशाची कल्पना केली जाऊ शकते का? कधीच नाही.” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video fadnavis responds to sharad pawars that statement about pm modi msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या