करोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना नोकरी गमवावी लागली. बेरोजगारीमुळे तरुणांना नोकरी शोधण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र, जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातील राजेंद्र पवार या तरुणाने परिस्थितीवर मात करत स्वतःचा ऊस रस विक्रीचा व्यवसाय सुरु केला. ऊस रस विकण्यासाठी त्याने भंगारातून साहित्य जमा करून देशी जुगाड करून चारचाकी गाडी तयार केली. त्याद्वारे तो आपला छोटासा ऊस रस विक्रीचा व्यवसाय करून परिवाराची उपजीविका भागवत आहे. या तरुणाने देशीजुगाड करुन तयार केलेल्या चारचाकी गाडीची सध्या पाचोरा शहरात जोरदार चर्चा आहे. जाणून घ्या त्याची यशोगाथा…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.