सांगली येथील रस्ते अपघातात जखमी झालेल्या सर्व वारकऱ्यांवर तातडीने उपचार करून गरज पडल्यास त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. मिरजचे जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या अपघाताबाबत माहिती घेऊन या वारकऱ्यांवर स्वखर्चाने उपचार करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला फोनवरून दिले निर्देश.जखमी वारकऱ्यांवर सर्वोत्तम उपचार करा, पैशांचा विचार करु नका, त्यांचा जीव महत्वाचा आहे असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चाने उपचार करतो असंही या अधिकाऱ्यांना सांगितलंय. वारकऱ्यांचा जीव महत्वाचा, पैशाचा विचार करू नका, मी सगळा खर्च करतो, तुम्ही फक्त त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यासंदर्भात काळजी घ्या असे निर्देश शिंदेंनी फोनवरुन दिले.

नक्की वाचा >> १३ हजार ३४० कोटींचा ‘तो’ निधी रोखला; अजित पवारांना शिंदे सरकारचा दणका

मिरज-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील केरेवाडी फाट्याजवळ मंगळवारी एक भीषण अपघात घडला. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत पीकअप जीप घुसून झालेल्या या अपघातात १७ वारकरी जखमी झाले. जखमींना तातडीने मिरज शासकीय रुग्णालय आणि कवठेमहांकाळ ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.

swati mahadik
स्वाती महाडिक यांच्या जिद्दीला बढतीचे बळ !
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले
Verbal dispute between BJP MLA sanjay Kute and Sena MLA Sanjay Gaikwad
“सकाळी अर्ज भरला अन संध्याकाळी…”, भाजपचे आमदार कुटे व सेनेचे आमदार गायकवाड यांची शाब्दिक जुगलबंदी

नक्की पाहा >> Photos: “घराची पायरी चढताच माझी…” CM होऊन घरी परतल्यानंतर शिंदेंची भावनिक पोस्ट; म्हणाले, “त्याने मला पाहिल्यावर…”

या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मिरजेचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपेश शिंदे यांना फोन केला. फोनवरुन मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यासोबत त्यांना लागतील ते सर्व उपचार करावेत. वेळ पडल्यास त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करावे त्यांच्यावरील उपचारात कोणतीही कसूर ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यासाठी लागेल तो खर्च उचलण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली.

नक्की पाहा >> Photos: शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत अनेकांनी केला प्रयत्न, अगदी राज ठाकरेही ठरले अपयशी; पण शिंदेंनी ‘करुन दाखवलं!’

या रस्ते अपघातात जखमी झालेल्या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत. त्यांना लागतील ते सर्व उपचार देऊ असे डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. आषाढी वारी अगदी दोन ते तीन दिवसांवर येऊन ठेपलेली असताना घडलेल्या या दुर्दैवी अपघातामुळे यंदाच्या वारीला गालबोट लागलं.

पाहा व्हिडीओ –

जखमी वारकऱ्यांच्या मदतीला खुद्द मुख्यमंत्री धावून आल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसतोय.