Video: ‘कृष्णकुंज’वर का भरतो ‘राज दरबार’? जाणून घ्या यामागची कारणं…

राज ठाकरे यांच्या दरबारी आल्यावर न्याय मिळेल असा विश्‍वास एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला.

MNS Raj Thackeray

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं होतं परंतु, तरीदेखील राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. या दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली संपूर्ण बाजू त्यांच्यासमोर मांडली. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करू नका मनसे आणि मी स्वतः तुमच्या पाठीशी आहे असं आवाहन राज ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पदाधिकाऱ्यांना केलं. राज ठाकरे यांच्या दरबारी आल्यावर न्याय मिळेल असा विश्‍वास एसटी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला. केवळ एसटी कर्मचारीच नाही तर यापूर्वीही अनेक संघटनांचे, संस्थांचे लोक राज ठाकरेंकडे आपले प्रश्न घेऊन गेलेत. पण हे असं का?, पाहुयात या खास व्हिडीओमधून…

लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video why so many workers and people go to meet mns chief raj thackeray with their issues scsg

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या