Vidhan Parishad Election Mahayuti MVA Candidates List updates : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून १८ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. गेल्या अडीच वर्षांपासून या निवडणुका लागल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या अडीच वर्षांपासून या आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. विधान परिषदेच्या एकूण ७८ सदस्य संख्येपैकी २२ सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जातात. यंदा सोलापूर, अहमदनगर, ठाणे, जळगाव, नांदेड, सांगली-सातारा, यवतमाळ, पुणे, भंडारा- गोंदिया, नाशिक आणि अमरावतीच्या स्थानिक संस्थेच्या विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक होत आहे.
दरम्यान, आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. दुपारी ३ पर्यंत अर्ज भरता येणार होते. या निवडणुकीसाठी अनेकजण उत्सुक होते. त्यामुळे प्रचंड दावे-प्रतिदावे झाले. महायुती आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेदही चव्हाट्यावर आले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गतच बंडाळी झाल्याचं दिसलं. पुण्यातून सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे या दोघांनीही राष्ट्रवादीच्या तिकिटावर अर्ज भरला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीत वाद झाला. या जागेवरून भाजपाने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे, तर शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या समीर सत्तार यांनीही अपक्ष अर्ज भरला आहे.
महायुतीमध्ये भाजपाच मोठा भाऊ
प्रचंड रस्सीखेच आणि दावे-प्रतिदावे झाल्यानंतर महायुतीतून १७ जगांसाठी उमेदवारांची नाव निश्चित झाली आहेत. भाजपा ११, शिवसेना (एकनाथ शिंदे) ४, राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर निवडणूक लढवणार आहेत.
भाजपा उमेदवारांची यादी
- वर्धा – चंद्रपूर – गडचिरोली- अरुण लखाणी
- भंडारा-गोंदिया- अविनाश ब्राह्मणकर
- अमरावती- प्रवीण पोटे
- सोलापूर- राजेंद्र राऊत
- सांगली सातारा- धैर्यशील कदम
- अहिल्यानगर- प्राजक्त तनपुरे
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट
- नांदेड – अमर राजूरकर
- धाराशिव बीड लातूर- बसवराज पाटील
- जळगाव- नंदकिशोर महाजन
- नागपूर- राजीव पोतदार
शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवारांची नावे
- ठाणे- रवींद्र फाटक
- नाशिक- नरेंद्र दराडे
- परभणी-हिंगोली- सईद खान
- यवतमाळ- दुष्यंत चतुर्वेदी
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) उमेदवारांची नावे
- रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग- अनिकेत तटकरे
- पुणे- विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे
महाविकास आघाडीत काँग्रेस मोठा भाऊ
महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस ९ जागांवर, शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष ५ जागांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे.
काँग्रेसच्या उमेदवारांची यादी
- चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली – शैलेश देशमुख
- अमरावती – हर्षदीप देशमुख
- यवतमाळ – साहेबराव कांबळे
- धाराशीव – लातूर- बीड – महेश देशमुख
- सोलापूर – आदित्य फत्तेपूरकर
- नागपूर – अतुल लोंढे
- अहिल्यानगर – करण ससाणे
- नांदेड – रामदास पाटील
- भंडारा-गोंदिया – दिलीप बनसोड, प्रफुल अग्रवाल आणि नरेश ईश्वरकर
शिवसेनेच्या उमेदवारांची नावे
- नाशिक – अनिल कदम
- परभणी- हिंगोली – डॉ. विवेक नावंदर
- छत्रपती संभाजीनगर – जालना – देवयानी कृष्ण पाटील डोणगावकर
- जळगाव – शरद तायडे
- रायगड-रत्नागिरी- सिंधुदुर्ग – सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
- सांगली-सातारा – अनिश्चित
- पुणे- श्रीकांत पाटील
- ठाणे- अभिजीत पवार
अपक्ष
छत्रपती संभाजीनगर-जालना- समीर सत्तार
