महाराष्ट्राच्या विधासनभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोमवारी म्हणजेच ७ मार्च २०२२ रोजी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर जोरदार टीका करत असतानाच त्यांच्या मागे बसलेल्या गिरीश महाजन यांना डुलकी लागण्याचा प्रकार घडला. फडणवीस भाषण देत असतानाच त्यांच्या मागे बसलेले महाजन मात्र सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच डुलक्या काढताना दिसले. हा सारा प्रकार लाइव्ह टेलिकास्टमध्ये कॅमेरात कैद झाल्यानंतर आता काँग्रेसने यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. काँग्रेसने या प्रकाराची तुलना एका चित्रपटातील दृष्याशी केलीय.

नक्की वाचा >> “अनिल देशमुख हिंदू, मराठा असल्याने लगेच राजीनामा पण नवाब मलिक मुस्लीम…”; नितेश राणेंचा पवारांना सवाल

नक्की घडलं काय?
शेतकऱ्यांनी वीज बिलांसंदर्भात सुरु केलेलं आंदोलन आणि सरकारने दिलेल्या आश्वासनांसंदर्भातील मुद्द्यावरुन सोमवारचा दिवस गाजला. फडणवीस यांनी सरकारवर टीका करताना अनेक मुद्दे मांडले. एकीकडे फडणवीस मोठ्या जोशाने भाषण करत महाविकास आघाडीवर टीका करत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मागील बाकावर बसलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांचा मात्र सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच डोळा लागला. फडणवीस भाषण देतानाच महाजन हे सभाग़हात डुलक्या काढताना दिसले. हा संपूर्ण प्रकार विधानसभेच्या लाइव्ह टेलिकास्टदरम्यान कॅमेरात कैद झालाय.

rajan vichare
भाजप आमदार संजय केळकर राजन विचारेंच्या भेटीला…
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
chirag paswan interview
काका-पुतण्यांमधील राजकीय लढाईचा अंत? काय म्हणाले चिराग पासवान?
Kangana Ranut and surpiya
काँग्रेसच्या महिला नेत्याने पोस्ट केलेल्या कंगनाच्या ‘त्या’ फोटोवरून वादंग; अभिनेत्री म्हणाली, “वेश्याव्यवसाय करणाऱ्या…”

नक्की वाचा >> देवेंद्र फडणवीस हे बाळासाहेबांनंतरचे खरे हिंदुहृदयसम्राट : नितेश राणे

झालं असं की, दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांनी फडणवीस हे राज्यातील एका प्रकरणासंदर्भात बोलताना एका अधिकाऱ्याने सरकारी कार्यालयामध्ये गोळीबार केला असं सांगत होते. नंतर हा गोळीबार कौटुंबिक कारणातून झाल्याचं सांगण्यात आल्याचं फडणवीस हातातील कागदांवरील मजकुराचा संदर्भ देत म्हणाले. 

शेलारांनी कोपर मारुन महाजनांना उठवलं…
फडणवीस या प्रकरणावरुन सरकारला प्रश्न विचारत असतानाच दुसरीकडे त्यांच्या मागील बाकावर बसलेल्या गिरीश महाजन यांचा डोळा लागला. एकदा त्यांनी डुलकीही मारली. नंतर आशिष शेलार यांनी त्यांच्या दंडावर कोपर मारुन त्यांना उठवलं. विशेष म्हणजे झोप मोड होताच महाजन यांनी थेट हात वर करत गोळीबार गोळीबार करत फडणवीसांच्या भाषणातील मुद्दा पुढे रेटला.

नक्की पाहा >> देशाचं नाव चुकीचं घेतल्यानं नारायण राणे ट्रोल; मुंबई विमानतळावरील व्हिडीओ झाला व्हायरल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरतोय. त्यातच काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही या साऱ्या प्रसंगाची तुलना जाने भी दो यारो चित्रपटामधील महाभारताच्या सीनशी केलीय. या चित्रपटामध्ये महाभारत सादर करताना भिमाची भूमिका साकारणारं पात्र स्टेजवरचं डुलकी लागल्याने झोपतं आणि त्यालाही शेजारी बसलेली व्यक्ती झोपेतून उठवते असं दाखवण्यात आलंय. या दोन्ही प्रसंगांची तुलना करत सचिन सावंत यांनी, “चित्रपट- भाजपा ची नौटंकी… लाइट्स, कॅमेरा, अ‍ॅक्शन” अशा कॅप्शनसहीत व्हिडीओ शेअर केलाय.

याप्रकरणी भाजपाकडून किंवा संबंधित नेत्यांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.