सोलापूर : बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने ठाणे येथे आयोजित केलेल्या वकील परिषदेत सोलापूरचे माजी जिल्हा सरकारी वकील विजय भास्कर मराठे यांना ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्काराने गौरविण्यात आले. फौजदारी, दिवाणी, सहकार, औद्योगिक, कामगार, स्थानिक स्वराज्य संस्था आदी संबंधित कायदेविषयक असंख्य खटले अ‍ॅड. मराठे यांनी यशस्वीपणे चालविले आहेत. १९७२ पासून पाच दशके त्यांना वकिलीचा अनुभव आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र व गोवाने त्यांना ठाण्यातील वकील परिषदेत सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अभय ओक यांच्या हस्ते ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्कार देऊन गौरविले.

या वेळी बार कौन्सिलचे अध्यक्ष व्ही. डी. साळुंके, उपाध्यक्ष राजेंद्र उमाप, माजी अध्यक्ष मिलिंद थोबडे यांच्यासह महाराष्ट्र व गोव्यातील बहुसंख्य वकिलांची उपस्थिती होती. मूळचे माढा तालुक्यातील निमगावचे अ‍ॅड. विजय मराठे हे वकिली व्यवसायासह विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करीत असताना मिळालेल्या संपूर्ण मानधनाची रक्कम कारगिल युद्धात वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसाठी कल्याण निधीत जमा केली होती. अलिकडे करोना महामारीच्या संकटकाळातही त्यांनी पाच लाख रुपयांची रक्कम पंतप्रधान सहायता निधीसाठी पाठविली होती. विधिक्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी अ‍ॅड. विजय मराठे यांना ज्येष्ठ विधिज्ञ पुरस्काराने सन्मानित करण्याबाबतचा प्रस्ताव अ‍ॅड. मिलिंद थोबडे यांनी महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडे पाठविला होता.

Mahayuti gathering in Washim, Gyayak Patni,
महायुतीचा मेळावा : मंत्री व पालकमंत्री उपस्थित अन् खुर्चीवरून वाद !
LK Advani Bharat Ratna
राष्ट्रपतींनी लालकृष्ण अडवाणींच्या घरी जाऊन दिला ‘भारतरत्न’, पंतप्रधान मोदीही उपस्थित
loksatta tarun tejankit award
‘तरुण तेजांकितां’वर पुनर्झोत!
chandrachud
‘लोकसत्ता तरुण तेजांकित’ सोहळा; सरन्यायाधीश चंद्रचूड प्रमुख अतिथि, विविध क्षेत्रांतील १८ प्रज्ञावंतांचा सन्मान