scorecardresearch

“चूक झाली असेल तर कारवाई करावी, पण…”, सत्यजीत तांबे प्रकरणावरून विजय वड्डेटीवारांचा काँग्रेसला घरचा आहेर!

“थोरातांच्या राजीनाम्याबाबत हायकमांड…”

vijay waddetiwar nana patole
नाना पटोले विजय वड्डेटीवार ( लोकसत्ता ग्राफिक्स टीम )

सत्यजीत तांबे प्रकरणावर राज्यात चर्चा सुरु आहे. मात्र, सत्यजीत तांबे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी याप्रकरणी आपली बाजू मांडली आहे. यात सत्यता आणि वस्तुस्थिती काय आहे, यावरून लोकांत संभ्रम आहे. हा संभ्रम दूर झाला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. चूक झाली असेल तर कारवाई करावी. पण, विनाकारण, कोणालाही आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये, असं मत माजी मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वड्डेटीवर यांनी व्यक्त केलं.

विजय वड्डेटीवार जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या विधिमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत बोलताना वड्डेटीवार म्हणाले, “थोरातांचा राजीनामा हा दुर्दैवाची बाब आहे. मात्र, राजीनामा मान्य करायचा की नाही, हा हायकमांडचा निर्णय आहे. याबाबत हायकमांड योग्य निर्णय घेईल.”

हेही वाचा : सचिन अहिर शिंदे गटात प्रवेश करणार? आमदाराच्या विधानाने खळबळ

“काँग्रेसकडून जनतेच्या अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपाच्या गडात आम्ही विजय मिळवला आहे. अमरावती विधानपरिषदेची जागा गृहित धरली नव्हती, तरी लोकांनी निवडून दिलं. विदर्भ हा भाजपाचा गड होता; पण लोकांनीच त्याला सुरुंग लावण्याचं काम केलं. अशा स्थितीत समन्वयाने, समोपचाराने आणि आपापसात ताळमेळ ठेऊन काम केलं पाहिजे,” असं विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2023 at 12:17 IST