scorecardresearch

“डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर…”; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान, म्हणाले…

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं.

Dr Babasaheb Ambedkar Vijay Wadettiwar
डॉ. आंबेडकरांचा उल्लेख करत वडेट्टीवारांचं मोठं विधान (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत मोठं विधान केलं. “डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं. परभणी येथे रविवारी (१९ नोव्हेंबर) थायलंड येथील सहा फूट उंचीच्या ५० बुद्धरूप मूर्तींचे वितरण आणि वैश्विक धम्मदेशना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास वडेट्टीवार बोलत होते.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोक्यात मुस्लीम धर्म स्वीकारण्याचा विचार आला असता, तर या भारताचे दोन तुकडे करावे लागले असते. आज वर दिल्लीत बसलेल्या लोकांनी हा विचार आपण केला पाहिजे.”

congress not get proposal from Prakash Ambedkar says mp kumar ketkar
“ॲड. प्रकाश आंबेडकरांकडून काँग्रेसला प्रस्तावच नाही,” खासदार कुमार केतकर यांनी स्पष्टच सांगितले; म्हणाले…
prakash ambedkar, narayan rane
“त्या चिंधीचोराने माझ्याशी…”, प्रकाश आंबेडकरांचा नारायण राणेंना टोला
elgar parishad to reduce tension between maratha and obc community prakash ambedkar claim before commission
वंचित बहुजन आघाडी लोकसभेच्या सर्व जागा लढवणार, प्रकाश आंबेडकरांची मोठी घोषणा
Vijay Wadettiwar
“दोन माणसं भाजपाबरोबर गेली तरी त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळेल, कारण…”, विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

“या लोकांचा विचार देश तोडणारा आहे”

“सध्या दिल्लीत गोपीचंद, फेकुचंद, तोरडमल हे लोक बसले आहेत. या लोकांचा विचार देश तोडणारा आहे,” असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलं.

हेही वाचा : भुजबळांमागे अदृष्य हात? एकत्र सभा घेतल्यानंतर वडेट्टीवारांचा आरोप; म्हणाले, “त्यांच्यावर दबाव…”

“…तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही”

यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मंदिरातील पुजाऱ्यांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “मंदिरातील दानपेट्या काढून टाकल्या, तर मंदिरात एकही पुजारी दिसणार नाही.” वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar big statement on dr babasaheb ambedkar muslim religion pbs

First published on: 20-11-2023 at 09:54 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×