scorecardresearch

“डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता तर…”; वादानंतर ‘त्या’ वक्तव्यावर वडेट्टीवार म्हणाले…

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते, असं वक्तव्य केलं.

Vijay Wadettiwar Dr Babasaheb Ambedkar
वादानंतर विजय वडेट्टीवारांचं 'त्या' वक्तव्यावर स्पष्टीकरण (छायाचित्र – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

राज्याचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर भारताचे दोन तुकडे झाले असते, असं वक्तव्य केलं. त्यांनी परभणीत रविवारी (१९ नोव्हेंबर) केलेल्या या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधकांकडून त्यावर टीका झाली. याबाबत विचारलं असता विजय वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण दिलं. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ नये, असं आवाहन केलं.

विजय वडेट्टीवार म्हणाले, “त्या भाषणात मी जो मुद्दा मांडला तो त्यावेळीही अनेक वक्त्यांनी मुद्दा मांडला होता. अनेक साहित्यिकांनीही हा मुद्दा मांडला होता. मी तो मुद्दा त्यावेळच्या परिस्थितीत नाही, तर आजच्या परिस्थितीत मांडला. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण धर्माधर्मात विष पेरणारी माणसं आज देशात राज्यकर्ते झाले आहेत.”

sadhvi pragya thakur, hindus and hindu dharma, speaking against hindu dharma
हिंदू विरुद्ध बोलाल तर समूळ उच्चाटन करू, साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे प्रतिपादन
Sharad Pawar Eknath Shinde Ajit Pawar
बंडानंतर धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? दिल्लीत एकनाथ शिंदे म्हणाले…
prakash-ambedkar Uddhav Thackeray
“ठाकरेंबरोबर साखरपुडा झालाय, पण लग्नासाठी दोन भटजी…”; प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
Prakash Ambedkar on BJP MP Congress
“संसदेत मुस्लीम खासदाराला शिवीगाळ, प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला सवाल, म्हणाले…

“राज्यकर्ते हिंदू-मुस्लिमांना एकमेकांविरोधात लढवत आहे”

“दिल्लीत काय चाललं आहे. तेथे हिंदू मुस्लीम यांना एकमेकांविरोधात लढवलं जात आहे. त्यामुळे आज डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाची काय परिस्थिती झाली असती. या आजच्या परिस्थितीनुसार मी ते वक्तव्य केलं आहे. त्याचा अर्थ आज डॉ. आंबेडकर असते आणि त्यांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. त्याला आजचे राज्यकर्ते जबाबदार असते,” असं मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केलं.

“देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू”

विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले, “देशात जाती-धर्मात विष पेरण्याचं काम सुरू आहे. तो कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा नव्हता, तर बुद्ध मूर्ती वितरणाचा होता. आपण बुद्धांच्या मार्गावर चाललो, तर देश आणि जग शांततेच्या मार्गावर चालेल. डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करताना ती स्पष्ट भूमिका मांडली होती.”

हेही वाचा : “डॉ. आंबेडकरांनी मुस्लीम धर्म स्वीकारला असता, तर…”; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान, म्हणाले…

“त्यावेळी आंबेडकरांना अनेकांकडून मुस्लीम धर्म स्वीकारण्याची विनंती”

“त्यावेळी बाबासाहेब आंबेडकरांना अनेकांनी मुस्लीम धर्म स्वीकारण्याची विनंती केली होती. आज ते असते आणि त्यांनी तो निर्णय घेतला असता, तर देशाचे दोन तुकडे झाले असते. कारण आजचे राज्यकर्ते दिल्लीत बसून दोन धर्मात विष पेरत आहेत. असं त्या बोलण्याचा अर्थ होता. माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढू नये,” असंही वडेट्टीवारांनी नमूद केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vijay wadettiwar giver clarification over dr ambedkar muslim statement pbs

First published on: 20-11-2023 at 11:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×