राज्यात यंदा पुरेसा पाऊस झालेला नाही. पावसाअभावी राज्यातल्या अनेक भागांमधील पिकांचं नुकसान झालं आहे. तर मान्सूनच्या सुरुवातीला विदर्भातील काही भागांना पूराचा तडाखा बसला होता. बुलढाण्यातील अनेक गावं अद्याप त्यातून सावरलेली नाहीत. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातले शेतकरी सातत्याने नवनव्या आव्हानांना तोंड देत आहे. पूर, नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव न मिळणं अशा अनेक कारणांमुळे शेतकरी मेटाकुटीला आहे. दरम्यान, राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाणही वाढलं आहे. गेल्या सात महिन्यांमध्ये महाराष्ट्रात १,५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील शेतकरी आत्महत्यांची विभागनिहाय आकडेवारी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
काँग्रेससह राज्यातले विरोधी पक्ष सातत्याने राज्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करत आहेत. दरम्यान, काँग्रेस
विजय वडेट्टीवार यांनी दिलेली शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी
अमरावती विभागात ६३७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
अमरावती १८३
बुलढाणा १७३
यवतमाळ १४९
अकोला ९४
वाशीम ३८
औरंगाबाद विभागात ५८४ शेतकरी आत्महत्या
बीड १५५
उस्मानाबाद (धाराशिव) १०२
नांदेड ९९
औरंगाबाद ८६
परभणी ५१
जालना ३६
लातूर ३५
हिंगोली २०
नाशिक विभागात १७४ शेतकरी आत्महत्या
जळगाव ९३
अहमदनगर ४३
धुळे २८
नाशिक ०७
नंदुरबार ०३
नागपूर विभागात १४४ शेतकरी आत्महत्या
चंद्रपूर ७३
वर्धा ५०
नागपूर १३
भंडारा ०५
गोंदिया ०३
पुणे विभागात १६ शेतकरी आत्महत्या
सोलापूर १३
सातारा ०२
सांगली ०१
(पुणे आणि कोल्हापूर
कोकण विभागात शेतकरी आत्महत्या नाही
हे ही वाचा >> महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणारे ‘ते’ दोन खासदार कोण? विरोधाचं कारण काय? महाराष्ट्रातील नेत्याचाही समावेश
जून महिन्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या
जानेवारी २२६
फेब्रुवारी १९२
मार्च २२६
एप्रिल २२५
मे २२४
जून २३३
जुलै २२९
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay wadettiwar says 1555 farmers committed suicide in 7 months in maharashtra asc